शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

स्मृती इराणींची लेक गोव्यात बोगस लायसनवर बार चालविते; काँग्रेसचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 17:07 IST

झोईश इराणीवर बनावट लायसन काढून बार चालवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे लायसन जून २०२२ मध्ये काढण्यात आले आहे.

काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी स्मृती इराणींची लेक झोईश इराणी ही मृत माणसाच्या नावावर लाय़सन घेऊन गोव्यात बार रेस्टॉरंट चालवित असल्याचा आरोप केला आहे. तसेच यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे इराणी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

झोईश इराणीवर बनावट लायसन काढून बार चालवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे लायसन जून २०२२ मध्ये काढण्यात आले आहे. ज्याच्या नावे हे लायसन काढले त्याचा मे २०२१ मध्येच मृत्यू झाला आहे. १३ महिन्यांपूर्वी ज्याचा मृत्यू झाला त्याच्यानावे जूनमध्ये लायसन काढण्यात आले आहे. गोव्यातील कायद्यानुसार एका रेस्टॉरंटला एकदाच लायसन मिळू शकते. परंतू सिली सोल्स बारला दोन लायसन्स दिले आहेत, असा आरोप खेरा यांनी केला आहे. 

याचबरोबर आणखी एक बेकायदेशीर बाब म्हणजे या रेस्टॉरंटला रेस्टॉरंट चालविण्याचे लायसन मिळालेले नाही, असे सांगत खेडा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचेही सांगितले आहे. त्यांनी ही नोटीसही मीडियाला दाखविली आहे. यावर झोईश इराणी यांच्या वकिलांनी हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहेत. झोईश यांचे अशा कोणत्याही रेस्टॉरंटशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. तसेच स्मृती इराणी यांनी या आरोपांवर काँग्रेसवर टीका केली आहे. 

सोनिया आणि राहुल गांधींच्या 5,000 कोटींच्या लूटप्रकरणी तिच्या आईने पत्रकार परिषद घेतली, ही माझ्या मुलीची चूक आहे. मी राहुल गांधींना 2024 मध्ये पुन्हा अमेठी लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे आव्हान देते, मी वचन देते की ते पुन्हा पराभूत होतील. माझी 18 वर्षांची मुलगी प्रथम वर्षात महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे आणि कोणताही बार चालवत नाही, असे त्या म्हणाल्या.  

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीgoaगोवाcongressकाँग्रेस