शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

“बनावट गोष्टी कोणीही ऐकणार नाही,” सिसोदियांबाबतच्या केजरीवालांच्या दाव्यानंतर स्मृती इराणींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 15:42 IST

मनीष सिसोदिया यांनाही तुरूंगात टाकण्याचा डाव असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता.

सत्येंद्र जैन यांच्यानंतर केंद्र सरकार मनीष सिसोदिया यांना बनावट आरोपांनुसार अटक केली जाणार आहे असं आपल्याला विश्वासार्ह सूत्रांकडून संगण्यात आल्याचा खळबळजनक आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली."खोट्या रडक्या कथा पसरवण्याऐवजी, स्वतःला निर्दोष सिद्ध करणे सोपे होईल कारण आता लोक ते ऐकणार नाहीत. एकाही प्रश्नाचं उत्तर न देता केजरीवाल यांनी एक प्रकारे त्यांच्या मंत्र्याची हवाला संबंध मान्य केले आहेत,” असं ट्वीट स्मृती इराणी यांनी केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेनंतर केलं. 

स्मृती इराणी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. सत्येंद्र जैन यांनी २०१०-११ ते २०१५-१६ या कालावधीत हवाला ऑपरेटर्सच्या मदतीने कोलकातामधील ५६ बनावट कंपन्यांचा वापर करून १६.३९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला नव्हता का? हे केजरीवाल नाकारू शकतात का असा सवाल इराणी यांनी केला होता. "आयकर आयुक्तांनी हे मानलं की १६.३९ कोटींचं बेहिशोबी उत्पन्न अंकुश जैन आणि वैभव जैन यांचं नसून सत्येंद्र जैन याचे खरे मालक होते हे खरं आहे का?,“ असा सवालही त्यांनी केला होता.काय म्हणाले होते केजरीवाल?सत्येंद्र जैन यांना ईडीनं कथितरित्या मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली आहे. याबाबातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. “मला वाटतं सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना खोट्या प्रकरणांमध्ये तुरुंगात टाकून या लोकांना दिल्लीत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुरू असलेले चांगले काम थांबवायचे आहे. पण काळजी करू नका, मी तसे होऊ देणार नाही. सर्व चांगली कामं सुरूच राहील,” असं केजरीवाल म्हणाले.

“मी काही महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं केंद्र सरकार बनावट प्रकरणात सत्येंद्र जैन यांना अटक करणार आहे. माझ्या विश्वसनीय सूत्रांनी मला लवकरच सिसोदिया यांना अटक केली जाणार असल्याचं सांगितलं आहे. केंद्रानं त्यांच्याविरोधात बनावट प्रकरणं तयार करण्याचे आदेश दिले आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालSmriti Iraniस्मृती इराणी