शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

Amarnath Yatra: अमरनाथ यात्रेत आता तंबाखू बंदी, हेल्मेटही सक्तीचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 06:52 IST

Amarnath Yatra: एक जुलैपासून सुरू होणारी अमरनाथ यात्रा यावेळी पूर्णपणे तंबाखूमुक्त असेल. यात्रा मार्गातील सर्व थांब्यांवर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

जम्मू : एक जुलैपासून सुरू होणारी अमरनाथ यात्रा यावेळी पूर्णपणे तंबाखूमुक्त असेल. यात्रा मार्गातील सर्व थांब्यांवर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, यात्रेकरूंचा पहिला जत्था ३० जूनला जम्मू-भगवतीनगर तळ शिबिरापासून गुहेकडे रवाना होईल. गतवर्षी पवित्र गुहेजवळ ढगफुटीमुळे पूर आला होता. त्यामुळे दरड आणि दगड कोसळण्याच्या घटना लक्षात घेता अडीच किमीच्या अतिजोखीम क्षेत्रात यात्रेकरूंसाठी हेल्मेट अनिवार्य करण्यात आले आहे. 

३ लाख भाविकांची झाली नोंदणी २८ जूनपर्यंत सुमारे ३.०४ लाख लोकांनी अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी केली आहे. हा आकडा गेल्यावर्षीच्या तुलनेत दहा टक्के अधिक आहे. 

हेल्मेट नि:शुल्क चरावरून जाणाऱ्यांनाही हेल्मेट अनिवार्य असेल, असे श्री अमरनाथ विश्वस्त मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनदीप कुमार भंडारी यांनी सांगितले. विश्वस्त मंडळाकडून हेल्मेट नि:शुल्क दिले जाणार आहे.

यात्रेकरूंसाठी ‘ऑन द स्पॉट’ नोंदणीजम्मू : अमरनाथ तीर्थयात्रेसाठी येथे येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाने गुरुवारी जागेवरच नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या यात्रेसाठी साधूंसह १,५०० हून अधिक यात्रेकरू जम्मू शहरात पोहोचले आहेत. अनोंदणीकृत यात्रेकरूंच्या जागेवरच नोंदणीसाठी शहरातील शालिमार परिसरात केंद्र सुरू करण्यात आले आहे, तर पुरानी मंडईतील राममंदिर संकुलात साधूंच्या नोंदणीसाठी विशेष शिबिर सुरू करण्यात आले आहे.

ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग ठप्पगोपेश्वर (उत्तराखंड) : मुसळधार पावसामुळे चमोली जिल्ह्यातील छिंका येथे दरड कोसळून ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे. लवकरच रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

अमरनाथ यात्रेपूर्वी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाने बालटाल आणि चंदनवाडी येथे प्रत्येकी १०० खाटांची दोन रुग्णालये बांधली आहेत. प्रशासनाने दोन्ही रुग्णालयांसाठी १३-१३ कोटी रुपये खर्च केले आहेत, असे जम्मू आणि काश्मीरचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण सचिव भूपिंदर कुमार यांनी सांगितले.

 

टॅग्स :Amarnath Yatraअमरनाथ यात्राJammu Kashmirजम्मू-काश्मीर