भावांच्या चेहर्यावरील स्मितहास्याने बहिणी गहिवरल्या
By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST
अनाथ मुलांना बांधल्या राख्या : जय हरी ग्रुपचा उपक्रम
भावांच्या चेहर्यावरील स्मितहास्याने बहिणी गहिवरल्या
अनाथ मुलांना बांधल्या राख्या : जय हरी ग्रुपचा उपक्रम शेलपिंपळगाव : भाऊ म्हणजे शक्ती... बहीण म्हणजे भक्ती... भाऊ म्हणजे कर्तव्य... बहीण म्हणजे वात्सल्य, असे हे परमपवित्र भाऊ-बहिणीचे नाते अधिक दृढ आणि घ करण्याची नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन जय हरी ग्रुपच्या महिला सदस्यांनी शेलपिंपळगाव येथील संपर्क अनाथ आश्रमातील मुलांना राख्या बांधून मोठ्या उत्साहात साजरे केले. हातात राख्या बांधताना मुलांच्या चेहर्यावरील स्मितहास्य पाहून बहिणींनाही गहिवरून आले. आळंदी, वडगाव-घेनंद गावांमधील तरुणांचा व्हॉट्सअप सोशल मीडिया जय-हरी ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हाती घेऊन ते यशस्वीरीत्या राबवीत आहे. ग्रुपमधील महिला सदस्यांनी रक्षाबंधनाचा पवित्र सण अनाथ आश्रमातील मुलांसमवेत साजरा करून इतरांसमोर एक चांगला आदर्श घालून दिला आहे. या उपक्रमात अनिता बर्गे, पल्लवी म्हसे, भारती घेनंद, निकिता शिंदे, चैताली झाडे, आर्या गव्हाणे, श्रेया घेनंद आदी महिला सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमप्रसंगी विनोद गांधिले, पांडुरंग घेनंद, निखिल गोसावी, शरद झाडे, संदीप घेनंद, अंकुश दौंडकर, संदीप बर्गे, डॉ. अमोल गांगुली उपस्थित होते. फोटो ओळ : शेलपिंपळगाव येथील अनाथ आश्रमात रक्षाबंधन साजरे करताना महिला भगिनी.