शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मस्तच! कोरोना लस घेतलेल्यांची 'ती' कटकट संपणार; केंद्राच्या सर्व राज्यांना स्पष्ट सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 06:38 IST

केंद्राची सूचना; आंतरराज्य प्रवास सुलभ हवा

नवी दिल्ली : देशात ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा पर्यटक, प्रवाशांना आंतरराज्य प्रवास करताना आरटी-पीसीआर चाचणी करण्याची तसेच त्याचे प्रमाणपत्र दाखविण्याची सक्ती करू नये अशी सूचना केंद्रीय पर्यटन विभागाने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केली आहे.ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशांना काही राज्यांमध्ये जाताना आरटी-पीसीआर चाचणी करावी लागत नाही. मात्र मुंबई, पुणे, चेन्नई येथून पश्चिम बंगालला जाणाऱ्या प्रवाशांना अद्यापही आरटी-पीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक आहे.कर्नाटक, गोवा, छत्तीसगढ या राज्यांतही अशीच बंधने आहेत. केंद्रीय पर्यटन खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, आंतरराज्य प्रवास करणाऱ्यांसाठी सर्व राज्यांनी एकाच प्रकारची नियमावली अंमलात आणावी.  आंतरराज्य प्रवास करणाऱ्या पर्यटकांना कोरोना काळात विविध राज्यांतील वेगवेगळ्या नियमांमुळे जो त्रास सहन करावा लागतो, त्याची माहिती पर्यटन व्यावसायिकांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिली. ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना पुन्हा आरटी-पीसीआर करायला न लावता महाराष्ट्र, सिक्कीम ही राज्ये आपल्या हद्दीत प्रवेश देत आहेत.समान नियम लागू कराकोरोना काळात देशातील सर्व राज्यांनी प्रवेशाबाबतचे समान नियम तयार केले तर पर्यटकांना, प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही असे केंद्र सरकारला वाटते. त्या अनुषंगाने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सर्व राज्यांना एक पत्र लिहिले आहे. तसेच सर्व राज्यांसाठी समान नियम तयार करण्यासाठी केंद्रीय पर्यटन खाते, नागरी हवाई वाहतूक खाते यांची एक संयुक्त बैठक लवकरच होणार आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या