शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:20 IST

Hyderabad Men Death Mystery: हैदराबादमधील नामापल्ली परिसरामध्ये एका जुन्या बंद असलेल्या घरात मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, मृतदेहाजवळ सापडलेल्या एका जुन्या मोबाईल फोनमुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

हैदराबादमधील नामापल्ली परिसरामध्ये एका जुन्या बंद असलेल्या घरात मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली होती. क्रिकेट खेळताना हरवेला चेंडू शोधण्यासाठी एक तरुण या घराजवळ गेला असताना या घटनेचा उलगडा झाला होता. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. आता पोलिसांनी केलेल्या तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा सांगाडा अमीर खान नावाच्या व्यक्तीचा असून, ते गेल्या १० वर्षांपासून बेपत्ता होते. सांगाड्याजवळ सापडलेल्या एका जुन्या नोकियाच्या फोनमुळे या व्यक्तीची ओळख पटवण्यात आणि या प्रकरणाचं  गुढ उकलण्यात पोलिसांना मोठी मदत झाली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार हैदराबादमधील नामपल्ली बाजार परिसरामध्ये असलेल्या एका जुनाट घरामध्ये हा मानवी सांगाडा सापडला होता. हे घर मागच्या सात वर्षांपासून बंद होतं. पोलिसांनी घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला असता त्यांना तिथे सांगाड्याजवळ एक जुना नोकियाचा फोन सापडला. सुरुवातीला हा हत्येचा प्रकार असू शकतो, असा संशय पोलिसांना आला. मात्र फोनची पडताळणी केली असता या मृतदेहाबाबत सर्व माहिती समोर आली. हा फोन चार्ज करून सुरू केला असता त्यामध्ये ८४ मिस कॉल आलेले दिसले. हे मृत अमीर खान याचे नातेवाईक आणि मित्रांचे होते. हे फोन २०१५ साली केलेले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अमीर खान हा मुनीर खान यांच्या एकूण १० मुलांपैकी तिसरा मुला होता. तो या घरात एकटा राहायचा. कुटुंबातील इतर सदस्य अन्यत्र निघून गेले होते. २०१५ मध्ये अमीर खान याचा नैसर्गिकरीत्या मृत्यू झाला होता. कदाचित एकटेपणा किंवा इतर कारणामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, अमीर खान याच्या सांगाड्या शेजारी सापडलेला मोबाईल आणि  नोटाबंदीपूर्वीच्या जुन्या नोटा यामुळे त्याचा मृत्यू २०१५ पूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.  

टॅग्स :TelanganaतेलंगणाCrime Newsगुन्हेगारी