शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
4
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
5
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
6
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
7
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
8
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
9
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
10
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
11
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
12
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
14
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
15
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
16
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
17
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
18
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
19
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
20
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
Daily Top 2Weekly Top 5

सहा नव्या पदव्युत्तर वैद्यकीय पदविकांना मिळाली मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 06:33 IST

वैद्यकशाखेतील विशेषज्ञ म्हणून अर्हता प्राप्त करण्याच्या नव्या संधी मिळतील व खास करून ग्रामीण भागांमध्ये अधिक संख्येने स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध होतील.

नवी दिल्ली : आंग्लवैद्यकशास्त्राच्या सहा शाखांमधील दोन वर्षांच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. यामुळे पदवीधर डॉक्टरांना एखाद्या वैद्यकशाखेतील विशेषज्ञ म्हणून अर्हता प्राप्त करण्याच्या नव्या संधी मिळतील व खास करून ग्रामीण भागांमध्ये अधिक संख्येने स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध होतील.मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाशी सल्लामसलत करून मंत्रालयाने यासंबंधीची अधिसूचना काही दिवसांपूर्वी राजपत्रात प्रसिद्ध केली. नॅशनल बोर्ड आॅफ एक्झामिनेशन्सतर्फे अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेऊन पदविका दिल्या जातील. हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा असेल व एमबीबीएस पदवीधारक कोणीही डॉक्टर त्यासाठी प्रवेश घेण्यास पात्र असेल.शंभरहून अधिक खाटांची सोय असलेले व वरिष्ठ 'स्पेशालिस्ट' डॉक्टर सेवेत असलेले कोणतेही सर्व आवश्यक सोयीसुविधांनी परिपूर्ण असे सरकारी अथवा खासगी रुग्णालय या पदविकांसाठी उमेदवारांना प्रशिक्षण देऊ शकेल. आतापर्यंत फक्त मेडिकल कौन्सिल व एनबीई यांच्या एमडी, एमएस, डीएनबीयासारख्या पदव्युत्तर पदव्यांना मान्यताप्राप्त वैद्यकीय अर्हता मानले जात असे. या पदव्युत्तर पदव्यांसाठी देशभरात ५० हजार प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटीला दरवर्षी सरासरी १.७० लाख पदवीधर डॉक्टर बसत असतात. म्हणजे ज्या १.२० लाख इच्छुकांना पदव्युत्तर पदवीला प्रवेश मिळू शकत नाही त्यांना या पदव्युत्तर पदविकांचा पर्याय उपलब्ध होईल. यामुळे आणखी किमान ३० ते ४० हजार जास्तीचे स्पेशालिस्ट डॉक्टर तयार होऊ शकतील. १.३० अब्ज लोकसंख्येच्या भारतात सध्या फक्त ४० हजार अ‍ॅनेस्थेशिओलॉजिस्ट उपलब्ध आहेत.>नवे अभ्यासक्रमडिप्लोमा इन अ‍ॅनेस्थेशिआॅलॉजी (डीए), डिप्लोमा इन पेडिआट्रिक्स (डीसीएच), डिप्लोमा इन फॅमिली मेडिसिन (डी. फॅम. मेडि.), डिप्लोमा इन आॅप्थॅल्मोलॉजी (डीओ), डिप्लोमा इन ईएनटी (डीएलओ), डिप्लोमा इन रेडिओ डायग्नॉसिस (डीएमआरडी) व डिप्लोमा इन ट्युबर क्युलॉसिस अ‍ॅण्ड चेस्ट डिसिज (डीटीसीडी). एनबीएकडून आॅगस्ट २०२० नंतर दिल्या जाणाºया या पदविकांना पदव्युत्तर वैद्यकीय अर्हता म्हणून मान्यता असेल.