शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आग्रा येथे भीषण अपघातात सहा ठार, कारच्या खिडक्या कापून मृतांना काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 02:57 IST

आग्रा येथे शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका भीषण रस्ता अपघातात सहा जण मृत्युमुखी पडले तर अन्य अनेक जखमी झाले.

आग्रा : आग्रा येथे शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका भीषण रस्ता अपघातात सहा जण मृत्युमुखी पडले तर अन्य अनेक जखमी झाले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फतेहाबाद-बाह मार्गावरील खंडेर गावाजवळ हा अपघात घडला. बाहकडून फराहाबादकडे सफरचंद घेऊन येत असलेल्या ट्रकची समोरून भरधाव येत असलेल्या एका कारसोबत जबरदस्त टक्कर झाली. ही टक्कर झाल्यानंतर ट्रकने दुसºया एका सँट्रो कारला धडक दिली. यावेळी दोन्ही कार ट्रकच्या खाली आल्याने त्यातील सहा जण जागीच ठार झाले. एक कार ट्रकच्या खाली दबल्यानंतर लोकांनी कारच्या खिडक्या कापून मृतांना बाहेर काढले.या अपघातात सँट्रो कारमधील इटावा निवासी आशिष गुप्ता, रोली (२८), सौरव आणि चालक अमित ठार झाले तर ५० वर्षीय गायत्री देवी गंभीर जखमी झाली. दुसरीकडे वॅगन आरमधील व्यापारी मनोज गुप्ता (रा. मुरैना) आणि चालक मनोज यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या कारमध्ये असलेले ७० वर्षीय रामस्नेही गुप्ता आणि ४० वर्षीय दिलीप गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी मोठा जमाव एकत्र आला. त्यामुळे किमान दोन तासपर्यंत वाहतूक ठप्प पडली होती. वॅगन आरमधील लोक एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी फरिदाबादला जात होते तर इटावाहून येणारी कार मुजफ्फरनगरला जात होती. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. त्याचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघात