शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सहा दिवसांत पेट्रोल १.५९ रु. डिझेल १.३१ रुपयांनी महागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 06:50 IST

दोन वर्षांतील उच्चांक; मुंबईत पेट्रोल ७९.२९ रुपये

नवी दिल्ली : सौदी अरेबियाच्या तेलप्रकल्पांवर हल्ल्यानंतर जगभरातील कच्च्या तेलाच्या बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे गत सहा दिवसांत दिल्लीत पेट्रोलचे दर १.५९ रुपये, तर डिझेलचे दर १.३१ रुपये प्रति लीटरने वाढले आहेत. २०१७ पासून पेट्रोलचे दर दररोज ठरवले जात आहेत. तेव्हापासूनची ही सर्वात मोठी वाढ आहे.रविवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरात २७ पैशांची वाढ झाली आणि पेट्रोल प्रति लीटर ७३.६२ रुपये प्रति लीटरवर पोहोचले. दिल्लीत डिझेलचे दर १८ पैशांनी वाढले आणि प्रति लीटरसाठी डिझेल ६६.७४ रुपयांवर पोहोचले. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिसूचनेनुसार इंधनाच्या दरात सलग सातव्या दिवशी वाढ झाली आहे. १७ सप्टेंबरपासून पेट्रोलच्या दरात एकूण १.५९ रुपयांची वाढ झाली आहे. याच काळात डिझेल १.३१ रुपयांनी महागले आहे. सौदी अरेबियातील प्रकल्पांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात पाच टक्क्यांची घट झाली आहे.अर्थात, सौदी अरेबियाने स्पष्ट केले आहे की, पुरवठा लवकरच सामान्य केला जाईल, पण तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर अनेक वर्षे दिसून येईल.सौदीतून भारताला किती होतो तेलपुरवठा?भारत आपल्या गरजेपैकी ८३ टक्के तेल आयात करतो. भारत आपल्या तेल आयातीपैकी पाचव्या हिश्श्यासाठी सौदीवर अवलंबून आहे. सौदी हा भारताचा सर्वात मोठा दुसरा तेल पुरवठादार आहे. सौदी अरेबियाकडून भारताला दर महिन्याला २० लाख टन कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो. सप्टेंबर महिन्यात यातील १२ ते १३ लाख टनांचा पुरवठा झाला आहे. उर्वरित पुरवठा लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदी अरेबियाच्या मंत्र्यांशी याबाबत चर्चा केली आहे. भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा कायम ठेवण्याचा विश्वास सौदीने व्यक्त केला आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलsaudi arabiaसौदी अरेबिया