शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदीकेअर’चा लाभ सहा जिल्ह्यांनाच! निधीअभावी सरकारची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 02:12 IST

गरिबांना मोफत वैद्यकीय सेवा देणारी ‘आयुष्यमान भारत’ ही योजना मोदी सरकार फक्त सहा जिल्ह्यांत राबविणार आहे. ‘मोदीकेअर’सह अन्य सामाजिक सुरक्षा योजना सरकारने घोषित तर केल्या, पण त्यासाठी सरकारकडे पुरेसा निधीच नाही.

नवी दिल्ली : गरिबांना मोफत वैद्यकीय सेवा देणारी ‘आयुष्यमान भारत’ ही योजना मोदी सरकार फक्त सहा जिल्ह्यांत राबविणार आहे. ‘मोदीकेअर’सह अन्य सामाजिक सुरक्षा योजना सरकारने घोषित तर केल्या, पण त्यासाठी सरकारकडे पुरेसा निधीच नाही.लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी स्वत:ची प्रतिमा उजळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना सामाजिक सुरक्षेचे कवच देणाऱ्या योजनांचा सपाटा लावला आहे. १० कोटी गरिबांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे वैद्यकीय कवच, वयस्कांसाठी निवृत्तिवेतन, गरोदर महिलांना विशेष भत्ता, बेरोजगारांना अर्थसाह्य या योजनांचा त्यात समावेश आहे. यासाठी सुमारे ३७,६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्या निवडणुकांआधी सुरू व्हाव्या, असा मोदी यांचा आग्रह आहे. पण निधीच्या कमतरतेमुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.निवडणुकांआधी या योजना सुरू करण्यासाठी सरकारला तत्काळ निधी उभा करावा लागेल. त्यासाठी जीडीपीच्या ०.३८ टक्के अर्थात ५०,००० कोटी रुपये खर्च करावा लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. आधीच वित्तीय तुटीचा तिजोरीवर भार असताना आता सामाजिक योजनांसाठी भरमसाट निधी उभा केल्यास ही तूट आणखी वाढण्याची भीती आहे.चार वर्षांत सामाजिक सुरक्षा ‘कोरडी’चसामाजिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारने चार वर्षांत काहीच केले नसल्याचे सेंटर फॉर बजेट अ‍ॅण्ड गव्हर्नन्स अकाऊंटेबिलिटीच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.देशातील ९०% कर्मचारी असंघटित क्षेत्रात आहेत. त्यांना सामजिक सुरक्षा देण्यासाठी सरकारला पाचव्या वर्षी जाग आली.या क्षेत्राला खºया अर्थाने सुरक्षा देण्यासाठी जीडीपीच्या किमान २%खर्च करण्याची गरज आहे.मात्र सरकारने चार वर्षांत यासाठी जीडीपीच्या फक्त ०.७५% खर्च केला. चारही वर्षांतील या क्षेत्रासाठीची अर्र्थसंकल्पीय तरतूद ०.४०% होती.महत्त्वाकांक्षी योजनासामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार सर्व कर्मचाºयांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आणत आहे. एकूण १५ कामगार कायदे एकत्र करून ही योजना तयार केली जाणार आहे. त्याचे विधेयक पावसाळी अधिवेशनात संसदेत मांडले जाणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्य