शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
3
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
4
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
5
एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
6
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
7
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
8
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
9
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
10
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
11
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
12
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
13
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
14
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
15
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
16
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
17
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
18
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
19
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
20
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी

लडाखमध्ये परिस्थिती खूपच गंभीर; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 10:51 AM

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लडाखमधील परिस्थिती 1962 नंतर सर्वात गंभीर बनली असल्याचे म्हटले आहे. जयशंकर यांनी त्यांचे पुस्तक अनावरण करण्याआधी रेडिफला मुलाखत दिली आहे.

चीनने लडाखमध्ये गेल्या काही महिन्यांपासून घुसखोरी केली आहे. जूनमध्ये भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करण्यात आला. यामध्ये 20 जवान शहीद झाले होते. यानंतर देशात चीनविरोधात संतापाची लाट आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमध्ये घुसखोरी झाली नसल्याचे सांगितले होते. आता सीडीएस जनरल रावत यांच्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांनीच लडाखमध्ये परिस्थिती गंभीर असल्याचे कबूल केले आहे. 

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लडाखमधील परिस्थिती 1962 नंतर सर्वात गंभीर बनली असल्याचे म्हटले आहे. जयशंकर यांनी त्यांचे पुस्तक अनावरण करण्याआधी रेडिफला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी सध्या 1962 नंतर सर्वांत गंभीर परिस्थिती ओढवली असल्याचे कबूल केले आहे. गेल्या 45 वर्षांत पहिल्यांदा एलएसीवर आमच्या सैनिकांना हौतात्म्य आले. सीमेवर दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले आहे. 

लडाखसह सीमेवरील वादामध्ये एकतर्फी तोडगा निघता नये. यामध्ये प्रत्येक सामंजस्य कराराचा सन्मान व्हायला हवा, असे जयशंकर म्हणाले. गेल्या दशकभरात अनेकदा चीनसोबत सीमा वाद उद्भवला आहे. डेपसांग, चूमर आणि डोकलाम. काही ठिकाणी हा वाद वेगळ्या प्रकारचा होता. सध्याच्या वादही अनेक बाबतीत वेगळा आहे. प्रत्येक वादावेळी एकच गोष्ट समोर येते, की तोडगा हा चर्चेद्वारेच काढला गेला पाहिजे. आम्ही चीनसोबत सैन्य आणि राजनैतिक दोन्ही पातळ्यांवर चर्चा करत आहोत. दोन्ही गोष्टी सोबत पुढे जात आहेत, असेही जयशंकर यांनी सांगितले.

दोन्ही देश एकत्र आले तर हे शतक आशियाचे असेल. या अडचणींमुळे यामध्ये बाधा येऊ शकते. चांगले संबंध दोन्ही देशांसाठी महत्वाचे आहेत. यात अनेक समस्याही आहेत, हे मी स्वीकारतो, असेही जयशंकर म्हणाले. 

चीनसोबत चर्चा फिस्कटली तर सैन्य कारवाईचा विचार : रावतचीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी काही दिवसांपूर्वी सीमेवर य़ुद्धसदृष्य परिस्थिती असल्याचे संकेत दिले होते. सांगितले की, लडाखमध्ये चिनी सेनेला मागे हटविण्यासाठी विविध स्तरांवर चर्चा सुरु आहेत. मात्र, सैन्य आणि राजनैतिक चर्चा अपयशी ठरली तर शेवटी सैन्य़ कारवाईचा पर्यायावर विचार केला जाणार आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी आजतकला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले आहे. एलएसीवर वादाचे कारण सीमारेषेबाबत वेगवेगळे विचार असतात. चीन आताही पेगाँग तलावाच्या परिसरात तळ ठोकून आहे. तो फिंगर5 पासून मागे हटण्यास तयार नाहीय. यावर रावत यांनी सैन्य पर्याय काय़ असतील यावर बोलण्यास नकार दिला. एलएसीवर वाद सोडविण्यासाठई भारत आणि चीनमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून अनेकदा सैन्य अधिकाऱ्यांच्या चर्चा झालेल्या आहेत. यामध्ये लेफ्टनंट, जनरल स्तरावरील चर्चा आहेत. राजनैतिक स्तरावरही चर्चा सुरु आहेत. संयुक्त सचिव स्तराचे अधिकारी चीनसोबत चर्चा करत आहेत. दोन्ही बाजुंकडून चीनवर तणाव कमी करण्यावर बोलणी केली जात आहेत. मात्र, अद्यापही एलएसी वादावर तोडगा निघालेला नाही. फिंगर आणि डारला भागात चीनची पिपल्स लिबरेशन आर्मी युद्धाभ्यास करत आहे. अशातच रावत यांनी सैन्य पर्यायाचे वक्तव्य करत चीनला मोठा इशारा दिला आहे. 

चीनची अट भारताला अमान्यआम्ही मागे हटू पण भारतानेही फिंगर ४ पासून स्वहद्दीत मागे जावे अशी अट चीनने ठेवताच भारताने त्यास नकार दिला. चिनी सैनिक फिंगर चारमध्ये स्वहद्दीत गस्त घालत नव्हते, आता तेथे सैनिकांची संख्या वाढली असल्याचे भारताला मान्य नाही. उलट फिंगर चारमध्ये भारतीय सैनिक गेल्या सहा दशकांपासून तैनात असल्याने मागे हटणार नाहीत, असे भारताने स्पष्ट केले. गेल्या तीन महिन्यांपासून चीनी ड्रॅगनची भारताने वेगवेगळ्या स्तरावर कोंडी केली आहे. चीनने स्वहद्दीत माघार घेतल्याशिवाय संबंध पूर्ववत होणार नाहीत, असे भारताने स्पष्ट केले.

चीनला सतावतेय दौलत बेग ओल्डी

चीनच्या प्रत्येक षडयंत्राला सामोरे जाण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहेत. चीनच्या या अस्वस्थतेचे मुख्य कारण म्हणजे दौलत बेग ओल्डी (डीबीओ) प्रदेशातील भारतीय सैन्याची ताकद आहे. जगातील सर्वात उंच हवाई पट्टी आणि सैन्य शिबिरामुळे डीबीओ संपूर्ण लडाखमध्ये भारताच्या अभिमानाचे प्रतीक आहे. भारतीय सैन्याची वाढती संख्या आणि या भागाचे मोक्याचे, मुत्सद्दी महत्त्व यामुळे चीन येथे कट रचत आहे. त्याचबरोबर हा वाद आणखी वाढल्यास चीनला जबर नुकसान सोसावं लागू शकतं, अशीही भीतीही त्याला सतावते आहे.  

डीबीओ हे एक असं क्षेत्र आहे जिथून भारतीय सैन्य चीनच्या अक्साई चीनमधील हालचालींवर लक्ष ठेवते. काराकोरम, अक्साई चीन, जियांग, गिलगिट-बाल्टिस्तान व गुलाम कश्मीरपर्यंत चीनच्या महत्त्वाकांक्षांना रोखण्याचं आणि वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) चिनी सैन्याला प्रत्युत्तर देण्यास डीबीओ नेहमीच तत्पर असते. सियाचीनमधील भारतीय सैन्यदलासाठीही हा मजबूत आधारस्तंभ आहे. भारताच्या मध्य आशियाई जमिनीशी संपर्क साधण्यासाठी हे फार महत्त्वाचे ठिकाण आहे. डीबीओ हे काराकोरम पर्वताच्या पूर्वेला असून, भारत-चीनच्या वास्तविक नियंत्रण रेषेच्या आठ किलोमीटर दूर ईशान्येकडे आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

बडे काम की चीज! LIC ने आणली नवी पॉलिसी; आयुष्यभर देणार उत्पन्न

शेवटी आयआयटीच ती! कारसाठी बनविली जबरदस्त बॅटरी; एका चार्जिंगमध्ये 1600 किमीची रेंज

CoronaVirus News चीनला भिडला! छोट्याशा देशाने कोरोनावर लस बनविली; साईड इफेक्ट शून्य

एकटीला पाहून साधुने बलात्काराचा प्रयत्न केला; मार्शल आर्ट मास्टर महिलेने धु धु धुतले

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख