शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण रेषेवरील परिस्थिती कधीही बिघडू शकते- लष्कर प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 20:40 IST

पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात वाढ

नवी दिल्ली: नियंत्रण रेषेवरील परिस्थिती कधीही बिघडू शकते. त्यासाठी देशानं सज्ज राहायला हवं, असं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमधील सीमावर्ती भागांमध्ये पाकिस्तानकडून सतत गोळीबार केला जात आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनांचं प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे. त्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुखांनी हे भाष्य केलं आहे.मोदी सरकारनं ५ ऑगस्टला जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. त्यामुळेच लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बिघडू शकते असं म्हटल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. मोदी सरकारनं नागरिकत्व कायद्यात केलेल्या बदलांमुळे दोन अण्वस्त्र देशांमध्ये युद्ध होऊ शकतं, असा इशारा खान यांनी कालच दिला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डींनी नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनात नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची आकडेवारी दिली होती. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत पाकिस्तानी सैन्याकडून ९५० वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्याचं रेड्डींनी सभागृहाला सांगितलं. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे. 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतPakistanपाकिस्तानArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर