शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांची दहशत, लहान मुलांच्या रस्त्यावर एकटं फिरण्यावर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 10:50 IST

खैराबाद भागात कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलीच्या मृत्यूनंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात हायअलर्ट जारी केला आहे.

सीतापूर- उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात कुत्र्यांची दहशत कमी होत नाहीये. रविवारी 10 वर्षाच्या मुलीचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. खैराबाद भागात कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलीच्या मृत्यूनंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात हायअलर्ट जारी केला आहे. तेथे कुठल्याही लहान मुलाला घराबाहेर निघण्यावर बंदी घालण्यात आली आहे. लहान मुलं घरातील मोठ्या सदस्याबरोबरच घराबाहेर पडतील, असा नियम घालून देण्यात आला आहे. 

नोव्हेंबर 20107पासून ते आत्तापर्यंत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एकुण 13 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 1 मे पर्यंत सात मुलं गंभीर जखमी झाली आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीतापूरमध्ये जाऊन मृत मुलांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर 48 तासाच्या आतच एका मुलाचा कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यामुळे घरातील एकातरी मोठ्या सदस्याने लहान मुलगा बाहेर जाताना त्याच्याबरोबर असावं, अशी सूचना करण्यात आली आहे. 

खैराबाद ठाण्याअंतर्गत  येणाऱ्या महेशपूर-चिल्लावर गावात रविवारी सकाळी 10 वर्षीय मुलगी रीना तिच्या तीन मैत्रिणींबरोबर आंबे वेचायला गेली होती. त्यावेळी कुत्र्यांच्या एका झुंबडीने मुलींवर हल्ला केला. कुत्र्यांना येताना पाहून इतर तिघी तेथून पळाल्या पण रीना कुत्र्यांच्या तावडीत सापडली. रीनाचा आवाज ऐकुन गावातील लोक घटनास्थळी आली व त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेचा गावातील स्थानिक लोकांनी जोरदार निषेध करत सरकारवर जोरदार टीका केली. एकामागे एक मुलांचे कुत्र्यांच्या हल्ल्ल्यात मृत्यू होत असताना जिल्हा प्रशासन काहीही करू शकत नाही, अशी टीका तेथिल लोकांनी केली.