शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 21:31 IST

गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, आज जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, हरयाणा आणि चंदीगड येथे 'ऑपरेशन शील्ड' नावाचा मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते.

आज जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, हरयाणा आणि चंदीगड येथे 'ऑपरेशन शील्ड' या नावाने मॉक ड्रिक झाले. संभाव्य युद्ध किंवा आपत्तीच्या बाबतीत नागरी संरक्षणाची तयारी तपासण्यासाठी ही मॉक ड्रिल आयोजित केले होते. गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार हे आयोजित करण्यात आले होते. 

Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना

मॉक ड्रिल अंतर्गत, नागरी संरक्षण वॉर्डन, स्थानिक प्रशासन कर्मचारी आणि एनसीसी, एनएसएस, एनवायकेएस, भारत स्काउट्स आणि गाईड्स सारख्या युवा स्वयंसेवकांना विविध कामांमध्ये नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी त्यांच्या सेवांसाठी बोलावण्यात आले.

जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील डीसी कार्यालयाबाहेर एक मॉक ड्रिल घेण्यात आले. पंजाबमधील अमृतसर येथेही हा सराव घेण्यात आला. अमृतसरचे कमांडंट जसकरण सिंह म्हणाले की, 'मॉक ड्रिल'चा उद्देश सर्व नागरी सुरक्षा विभाग एकमेकांशी कसा समन्वय साधतात याचा आढावा घेणे आहे.

"अनेक जिल्हे पाकिस्तानशी सीमारेषा शेअर करत असल्याने त्यांना जास्त धोका आहे. अमृतसर, पठाणकोट, तरणतारन, गुरुदासपूर, फिरोजपूर आणि फाजिल्का अशा मॉक ड्रिलचा उद्देश युद्धसदृश परिस्थितीत जास्तीत जास्त प्रशासन कार्यरत राहावे याची खात्री करणे आहे. तसेच, हवाई हल्ले आणि ड्रोन हल्ल्यांदरम्यान घरी कसे सुरक्षित राहायचे याचा सराव करणे आहे. ब्लॅकआउट दरम्यान स्वतःचे संरक्षण कसे करावे, हे ऑपरेशन शील्ड आहे.

या दरम्यान, हवाई दल आणि नागरी सुरक्षा नियंत्रण कक्षांमधील हॉटलाइन सक्रिय करण्यात आली. यासोबतच हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन देखील वाजवण्यात आले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूर