शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:33 IST

SIR Nationwide: बिहारनंतर आता देशभरात मतदार याद्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.

SIR Nationwide: उद्या, म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून देशातील 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल निरीक्षण (Special Intensive Revision- SIR) प्रक्रिया सुरू होत आहे. या मोहिमेद्वारे मतदारांची पडताळणी, नावे अपडेट करणे आणि दुहेरी नोंदी काढून टाकण्याचे काम होणार आहे. परंतु, अनेक राज्यांतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी या मोहिमेचा तीव्र विरोध केला आहे.

12 राज्यांमध्ये मोठी मोहीम सुरू

पहिल्या टप्प्यात बिहारमध्ये SIR ची प्रक्रिया राबवल्यानंतर, आता दुसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, पुडुचेरी, अंडमान-निकोबार आणि लक्षद्वीप येथे राबवली जाणार आहे. 4 नोव्हेंबरपासून सुरू होणारी डोअर टू डोअर पडताळणी 4 डिसेंबरपर्यंत चालेल. तर, 7 फेब्रुवारी 2026 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.

डीएमकेची न्यायालयात धाव

तमिळनाडूमधील सत्ताधारी द्रविड मुनेत्र कळघम (DMK) पक्षाने SIR विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी विविध पक्षांची बैठक घेऊन या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. डीएमकेचे म्हणणे आहे की, 2026 मध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने ही प्रक्रिया निवडणुका झाल्यानंतरच व्हावी. मात्र, निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव नाकारला आहे. या बैठकीत काँग्रेस, MDMK, डावे, IUML, मक्कल नीधि मय्यम (कमल हासन), तसेच इतर सहयोगी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पश्चिम बंगालमध्ये ममतांचा मोर्चा

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) ने या प्रक्रियेविरोधात थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 4 नोव्हेंबरला कोलकात्यात मोठा मार्च काढणार आहेत. टीएमसीने आरोप केला आहे की, “या प्रक्रियेद्वारे मतदार कपात केली जात आहे. आम्ही कोणत्याही पात्र मतदाराला यादीतून वगळले जाणार नाही याची खात्री करू.”

उत्तर प्रदेशात सपाची वेगळीच मागणी

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी SIR प्रक्रियेत जातीय जनगणनेचा कॉलम समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. तर, सपा खासदार धर्मेंद्र यादव यांनी याला विरोध करत सांगितले की, या प्रक्रियेच्या माध्यमातून विरोधकांच्या मतांवर गदा आणण्याचा प्रयत्न होत आहे.

AAP आणि काँग्रेसचा निवडणूक आयोगावर निशाणा

आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी SIR प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी दावा केला की, बिहारमध्ये या प्रक्रियेनंतर 5 लाख डुप्लिकेट मतदार यादीत राहिले आहेत आणि 80 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. त्यांच्या मते, हा मोठा निवडणूक घोटाळा आहे. काँग्रेसनेही आयोग आणि केंद्र सरकारवर टीका करत “वोट चोरीचा प्रयत्न” असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी याविरोधात अलिकडेच ‘वोटर अधिकार यात्रा’ काढली आणि आयोग सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

केरळच्या डाव्या सरकारचाही विरोध

लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (LDF) सरकारनेही या प्रक्रियेचा विरोध केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. एलडीएफचे म्हणणे आहे की, राज्यात स्थानिक निवडणुका जवळ आल्या असताना SIR प्रक्रिया राबवणे योग्य नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : SIR Rollout in 12 States Faces Opposition Over Voter List Concerns

Web Summary : Twelve states begin Special Intensive Revision of voter lists amid political opposition. Parties like DMK, TMC, and AAP allege voter suppression and demand process changes or postponement, citing upcoming elections and data integrity issues. The final voter list is expected February 7, 2026.
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदानElectionनिवडणूक 2024Uttar Pradeshउत्तर प्रदेशwest bengalपश्चिम बंगालTamilnaduतामिळनाडू