शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल न्यूज पान हॅलो 3

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

स्वप्नाली मित्रगोत्रीस इंग्लिश मॅरेथॉन स्पर्धेत सुवर्णपदक

स्वप्नाली मित्रगोत्रीस इंग्लिश मॅरेथॉन स्पर्धेत सुवर्णपदक
सोलापूर : ज्ञानप्रबोधिनी शाळेतील विद्यार्थिनी स्वप्नाली अरुण मित्रगोत्री हिने इंग्लिश मॅरेथॉन स्पर्धेत राज्यात 15 क्रमांक मिळवला. इंग्रजी शिक्षण महामंडळाच्या वतीने या स्पर्धा घेण्यात आल्या. सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन तिचा गौरव करण्यात आला. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. छत्रपती शिवाजी सायं. महाविद्यालयातील प्रा. अरुण मित्रगोत्री यांची ती मुलगी आहे.
भारतीय मजदूर संघ संपात सहभागी होणार
सोलापूर: ऑल इंडिया स्तरावर व महाराष्ट्र प्रदेशच्या भारतीय मजदूर संघाच्या निर्णयानुसार संघटनेशी संलग्न सर्व उद्योगातील कामगार 2 सप्टेंबर रोजी संपावर जातील असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सर्वांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारत तांबोळकर, अ. रा. मोडक यांनी केले आहे.
पोलीस भरती मार्गदर्शन शिबीर
सोलापूर: येथील एम्स स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये रविवारी 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता लोकसेवा आयोग व पोलीस भरतीचे मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एम्स स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने केले आहे.
शेतीपूरक उद्योगाचे प्रशिक्षण
सोलापूर: जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने 31 ऑगस्टपसून शेळीपालन,कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय या शेतीपूरक उद्योगाचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात शेळ्यांच्या, गाई-म्हशींच्या जाती, आजार, लसीकरण, आहार, चारा आदीचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
सा. बां. कर्मचारी संघटनेची द्वारसभा
सोलापूर: सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटनेच्या वतीने कर्मचार्‍यांची द्वारसभा सात रस्ता येथील कार्यालयाच्या आवारात पार पडली. यावेळी यात 2 सप्टेंबरच्या मोर्चात सहभागी होणे तसेच चतुर्थर्शेणी कर्मचार्‍यांच्या लाक्षणिक संपास पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी अशोक इंदापुरे, शंतनू गायकवाड, नागनाथ माळवदकर, विजयकुमार पोतदार, चंद्रकांत चलवादी आदी उपस्थित होते.
सोलापूर- अंदमान स्वच्छता दिंडी
सोलापूर: स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या 50 व्या आत्मसर्मपण स्मृतीवर्षानिमित्त 5-6 सप्टेंबर रोजी पोर्ट ब्लेअर, अंदमान येथे चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. यानिमित्त सोमवारी (31 ऑगस्ट) सायंकाळी 5 वाजता चार हुतात्मा येथून ‘सोलापूर-अंदमान स्वच्छता दिंडी’ निघणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कवी फुलचंद नागटिळक यांनी केले आहे.