सिंगल न्यूज
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
दहीहंडी उत्सव साजरा
सिंगल न्यूज
दहीहंडी उत्सव साजरा अहमदनगर : फकिरवाडा येथील यशवंत माध्यमिक विद्यालयात रविवारी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला़ पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़ विद्यार्थी या सोहळ्यात राधा, कृष्णाची वेषभूषा करून सहभागी झाले होते़ कार्यक्रमाला मुख्याध्यापिका एच़सी बनकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते़ शिक्षक दिन साजरा अहमदनगर : सारोळाबद्धी येथील विश्वभारती महाविद्यालयात शनिवारी शिक्षक दिन साजरा झाला़ या दिवशी विद्यार्थ्यांनीच शिक्षकांची भूमिका निभावत शालेय कामकाजाचे नियोजन केले़ यावेळी विद्यार्थ्यांच्यावतीने शिक्षकांचा गौरव करण्यात आला़ रवींद्र चोभे यांची निवड अहमदनगर: शहरातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ़ रवींद्र चोभे यांची निवड झाली आहे़ चोभे हे याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते़ चोभे यांचे संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवाण, कार्यवाहक सोमनाथ दिघे, अरुण धर्माधिकारी, क़दि़ कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे़