शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

बोगद्याजवळ आता सन्नाटा! सर्व कामगार तंदुरुस्त, डॉक्टरांनी दिली घरी परतण्याची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 06:16 IST

Uttarkashi Tunnel Rescue: उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यातून ४१ कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर एका दिवसानंतर बुधवारी ही जागा पूर्णपणे निर्जन दिसली. तेथे अक्षरश: सन्नाटा होता.

उत्तरकाशी : उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यातून ४१ कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर एका दिवसानंतर बुधवारी ही जागा पूर्णपणे निर्जन दिसली. तेथे अक्षरश: सन्नाटा होता. दरम्यान, एम्स-ऋषिकेशच्या डॉक्टरांनी सर्व कामगारांची तपासणी करून त्यांना घरी परतण्याची परवानगी दिली आहे.

मोठ्या बचाव मोहिमेदरम्यान बंद करण्यात आलेले बोगद्याभोवतीचे रस्ते बुधवारी खुले करण्यात आले. बोगद्यावर पोलिसांची एक तुकडी मात्र तैनात करण्यात आली आहे. एका पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले की, बोगद्याचे बांधकाम काही दिवस बंद राहणार आहे. एका कामगाराने सांगितले की, त्याला दोन दिवस विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे, त्यानंतर त्याला कंत्राटदाराकडून कळवले जाईल. दुसरीकडे सुरक्षा तपासणी होईपर्यंत काम बंद राहील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. बचाव पथकातील सदस्य आपली यंत्रे गुंडाळून ठेवताना दिसत आहेत.

कामगारांवर झाली पैशांची बरसातबोगदा बांधणारी नवयुग ही कंपनी आता बोगद्यातून सुरक्षितपणे बाहेर काढलेल्या कामगारांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई देणार आहे.याच वेळी सर्व मजुरांना दोन महिन्यांच्या पगारासह रजाही देण्यात येणार आहे. सर्वांत मोठी बाब म्हणजे या बचावकार्यात सहभागी झालेल्या कामगारांना दोन महिन्यांचा बोनसही दिला जाणार आहे. उत्तराखंड सरकार बोगद्यामध्ये अडकलेल्या प्रत्येक कामगाराला एक लाख रुपये, हॉस्पिटलचा खर्च आणि प्रवासभाडे देत आहे. 

या प्रेमानेच आपला भारत देश तयार झाला आहे...बोगद्यात अडकलेल्या मजूर बांधवांना सोडवण्याच्या प्रयत्नात जेव्हा मोठ्या मशिन्स कुचकामी ठरल्या तेव्हा रॅट मायनर्सना हाताने बोगदा खोदण्यासाठी बोलावण्यात आले. या कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून अवघ्या २४ तासांत बचावकार्य पूर्ण केले.कामगारांपैकी एक असलेल्या मोहम्मद ईर्शादने प्रत्येकासाठी  प्रार्थना केली आहे की, देशात प्रेम टिकून राहावे आणि प्रत्येक व्यक्तीवर माणूस म्हणून प्रेम केले जावे. नासिर हुसेन या दुसऱ्या रॅट होल खाणकाम करणाऱ्या कामगाराने अडकलेल्या कामगारांना दिसताच मिठी मारली, हेच प्रेम आहे. या प्रेमानेच आपला भारत देश तयार झाला आहे. जय हिंद असे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.रॅटमायनर्सना ५० हजारमजुरांचे प्राण वाचवणाऱ्या रॅट खाण कामगारांना सरकारने प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या कामगारांना नवयुग कंपनी दोन महिन्यांचा बोनसही देणार आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडIndiaभारत