शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आयोगाने अपात्रता कमी केल्याने सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांचे पद शाबूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 04:46 IST

भ्रष्टाचाराच्या एका खटल्यात शिक्षा झाल्याने लागू झालेल्या सहा वर्षांच्या अपात्रतेमध्ये निवडणूक आयोगाने रविवारी कपात केली.

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या एका खटल्यात शिक्षा झाल्याने लागू झालेल्या सहा वर्षांच्या अपात्रतेमध्ये निवडणूक आयोगाने रविवारी कपात केल्याने सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांना आता पोटनिवडणुकीत विधानसभेवर निवडून येऊन पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री पदावर कायम राहणे शक्य होणार आहे.एप्रिलमध्ये लोकसभेसोबत सिक्किम विधानसभेची निवडणूक झाली. त्यात अपात्रतेमुळे स्वत: तमांग यांनी निवडणूक लढविली नाही. पण त्यांच्या सिक्किम क्रांतीकारी मोर्चा या पक्षाने ३२ पैकी १७ जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळविले. विधिमंडळ पक्षाने तमांग यांची रीतसर नेतेपदी निवड केली व राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करून मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यामुळे स्वत: आमदार नसूनही तमांग लोकप्रिय सरकारचे मुख्यंमत्री झाले. पण तरीही राज्यघटनेतील तरतुदीनुसार त्यांना मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्यासाठी सहा महिन्यांत विधानसभेवर निवडून येणे भाग होते. परंतु अपात्रता सन २०२४ पर्यंत लागू राहणार असल्याने तमांग यांना सहा महिन्यांत विधानसभेवर निवडून जाणेही शक्य नव्हते.अशा विचित्र कोंडीत सापडलेल्या तमांग यांनी यंदाच्या जुलैमध्ये निवडणूक आयोगाकडे अर्ज करून आपल्याला लागू झालेली अपात्रता रहीत करण्याची विनंती केली. लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम ११ अन्वये फौजदारी खटल्यात शिक्षा झाल्याने एखाद्या लोकप्रतिनिधीस लागू झालेली अपात्रता, सबळ कारणे असतील तर, पूर्णपणे रद्द करण्याचे किंवा त्यामध्ये कपात करण्याचे अधिकार निवडणूक आयोगास आहेत. तमांग यांच्या अर्जावर रविवारी निकाल देताना मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा व निवडणूक आयुक्त सुशील चंद्र आणि अशोक लवासा यांनी या अधिकाराचा वापर केला आणि तमांग यांच्या अपात्रेमध्ये कपात करून ती एक वर्ष एक महिना एवढी केली.काय आहे प्रकरण?तमांग पूर्वी सिक्कीम सरकारमध्ये पशुसंवर्धनमंत्री असताना लाभार्थींना गायी वाटप करण्याची एक सरकारी योजना राबविली गेली होती. त्या योजनेच्या निधीचा अपहार केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर सन १९९६ मध्ये भ्रष्टाचाराचा खटला दाखल झाला. त्यात त्यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सन २०१६ मध्ये सुनावण्यात आली. पुढे नोव्हेंबर २०१७ अखेरीस अपिलांमध्ये ही शिक्षा कायम झाली. १० आॅगस्ट २०१८ पर्यंत तमांग यांनी ही शिक्षा भोगून पूर्ण केली. त्या दिवसापासून सहा वर्षांची अपात्रता लागू झाली.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगsikkimसिक्किम