शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शीख मुलाला अमेरिकेत मारहाण, सुषमा स्वराज यांनी मागविला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 12:33 IST

शीख मुलाला अमेरिकेत मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अहवाल मागविला आहे.

ठळक मुद्देशीख मुलाला अमेरिकेत मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अहवाल मागविला आहे. अमेरिकेतील भारतीय दुतावासाला याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश सुषमा स्वराज यांनी दिले आहेत. 

नवी दिल्ली- शीख मुलाला अमेरिकेत मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अहवाल मागविला आहे. अमेरिकेतील भारतीय दुतावासाला याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश सुषमा स्वराज यांनी दिले आहेत.  शीख मुलाला अमेरिकेत मारहाण झाल्याची घटना घडल्याचं मी बातम्यांमध्ये पाहिलं आहे. या घटनेबद्दल अमेरिकेतील भारतीय दुतावासाला अहवाल सादर करायला सांगितलं आहे, असं ट्विट शनिवारी सुषमा स्वराज यांनी केलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, केंट्रिझ हाय स्कूलमधील एका 14 वर्षीय मुलाला त्याच्या वर्गातील काही मुलांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ तयार करून तो स्नॅपचॅटवर शेअर करण्यात आला. शीख मुलाचा त्याच्या वर्गातील मुलांनी पाठलाग केला. नंतर त्याला अचानक त्या मुलांनी मारायला सुरूवात केली. त्या मुलांनी पीडित मुलाला मारहाण करण्याच सुरूच ठेवलं होतं. तो मुलगा सतत स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करत होता. हा संपूर्ण प्रकार व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतो आहे.

मुलगा भारतीय वंशाचा आणि शीख असल्याने त्याच्यावर हल्ला झाल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. पण मुलावरील हल्ला हा धार्मिक मुद्द्यावरून झाल्याचा आरोप शाळेने फेटाळला आहे. मुलाला ज्याने मारहाण केली तसंच ज्याने त्या मारहाणीचा व्हिडीओ तयार केला, त्यांना कडक शिक्षा केली असल्याचं, केन्ट स्कूलचे कम्युनिकेशन डायरेक्टर क्रिस लोफ्टिस यांनी म्हंटलं. 

सहा महिन्यांपूर्वी केन्टमध्ये एका शीख नागरिकाची गोळी झाडून हत्या केली होती. तुमच्या देशात निघून जा, असं ओरडत हल्लेखोराने त्या नागरिकाची हत्या केली. सहा महिन्यानंतर पुन्हा मारहाणीची घटना घडली आहे.  

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजAmericaअमेरिका