शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! लग्नाआधीच नवरीच्या 3 भावांचा मृत्यू; कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 12:28 IST

अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांमध्ये वधूचा सख्खा भाऊ आणि दोन चुलत भावांचा समावेश आहे. वधूचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाला आहे.

राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. लोसल पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री उशीरा झालेल्या भीषण अपघातात तीन भावांचा मृत्यू झाला. हे तिन्ही भाऊ आपल्या बहिणीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. तीन मुलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांमध्ये वधूचा सख्खा भाऊ आणि दोन चुलत भावांचा समावेश आहे. वधूचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

लोसल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. एका कारमधून चार तरुण काही कामासाठी जात होते. दरम्यान, त्यांची कार नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या खांबाला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर चौथा गंभीर जखमी झाला. 

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाणे आणि लोकांनी घटनास्थळ गाठून मृत व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तीन तरुणांना मृत घोषित केलं आणि चौथ्या तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला प्राथमिक उपचार करून सीकर कल्याण रुग्णालयात रेफर करण्यात आलं. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांमध्ये शीशराम ओला (20), धर्मेंद्र जाट (19) आणि लोकेश जाट (20) यांचा समावेश आहे. 

शीशराम हा वधूचा सख्खा भाऊ असल्याचं सांगितलं जातं. वधूचा चुलत भाऊ सुनील जाट (15) हा गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर सीकर येथील कल्याण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेने हसत खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे.  

टॅग्स :Accidentअपघात