शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In India : “आपल्याकडे बूस्टर डोस देण्यास आधीच उशीर, महासाथीच्या वेळेसारखी नियामक संस्थांनी तत्परता दाखवावी”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 16:13 IST

कोरोनाचा विषाणू वेळोवेळी आपलं रूप बदलत आहे आणि त्याचे नवे व्हेरिअंट्सही समोर येत आहेत, बूस्टर डोस आवश्यक; पूनावाला यांचं वक्तव्य.

Coronavirus In India : सध्या अनेक देशांमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. तर दुसरीकडे भारतात कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली असली तरी गेल्या काही दिवसांमध्ये सापडणारे कोरोनाबाधित पाहून हा धोका पूर्णपणे टळला असं म्हणता येणार नाही. केंद्रानं आता १८ वर्षांवरील सर्वांनाच बूस्टर डोस घेण्यासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान, सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी बूस्टर डोस आणि लसीकरण मोहिमेवर आपलं मत व्यक्त केलं आहे. “कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस आवश्यक आहे. यामुळे लोक सुरक्षित राहतील. कोरोनाचा विषाणू वेळोवेळी आपलं रूप बदलत आहे आणि त्याचे नवे व्हेरिअंट्सही समोर येत आहेत,” असं पूनावाला म्हणाले.

“सरकारनं लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी केलं ही चांगली बाब आहे. आम्ही गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून बूस्टर डोसला मंजुरी द्यावी यासाठी विनंती करत होतो, परंतु यात उशीर झाला. हे काम लवकर होणं आवश्यक होतं. मी सरकारवर टीका करत नाही, परंतु कोरोनाच्या महासाथीदरम्यान ज्या प्रकारे नियामक संस्थांनी तत्परता आणि सक्रियता दाखवली, तसं आताही व्हायला हवं,” असं पूनावाला म्हणाले. टाइम्सच्या इंडिया इकॉनॉमिक कॉनक्लेव्ह या कार्यक्रमात त्यांनी यावर भाष्य केलं.

चार पाच बूस्टर डोसची गरज नाही“कोरोनाच्या महासाथीमध्ये स्वदेशी लसींनी चांगली कामगिरी केली. अनेक विकसित देशांच्या तुलनेत भारतातील लसीकरण मोहीम उत्तम स्थितीत आहे. आपल्याला दुसऱ्या लोकांप्रमाणे चार पाच बूस्टर डोस घेण्याची गरज नाही. आपल्याकडे बूस्टर डोस घेण्यास आधीच विलंब झाला आहे. लस घेतल्यावर सहा महिन्यांनंतर लसीची प्रतिकारक क्षमता कमी होत जाते हे आपल्याला माहित आहे. बूस्टर डोसनं ती वाढू शकते. खबरदारीचा उपाय म्हणून आपण ती लोकांना देऊन रुग्णालयात दाखल होण्यापासून किंवा गंभीर आजारी पडण्यापासून वाचवू शकतो,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Adar Poonawallaअदर पूनावालाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस