शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हे तर तुमच्या अज्ञानाचे द्योतक; स्वराज यांचं थरूर यांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 22:38 IST

संयुक्त राष्ट्रामध्ये हिंदीला अधिकृत दर्जा देण्याच्या मुद्द्यावर आज लोकसभेत प्रश्न विचारले जात असताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्यात झालेल्या संवादाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रामध्ये हिंदीला अधिकृत दर्जा देण्याच्या मुद्द्यावर आज लोकसभेत प्रश्न विचारले जात असताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्यात झालेल्या संवादाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. एक हिंदी भाषेतील प्रभावी वक्ता आणि दुसरा इंग्रजी भाषेतील तितकाच प्रभावी वक्ता यांच्यात संवादाची ही घटना आहे.संयुक्त राष्ट्रामध्ये हिंदीला अधिकृत भाषा बनवण्यासाठी फक्त तेथील प्रक्रियेची अडचण आहे, असे वक्तव्य सुषमा स्वराज यांनी केले. हिंदी भाषेला हा दर्जा मिळावा यासाठी १९३ पैकी १२९ देशांची सहमती आपण मिळवू शकतो, मात्र तसे करण्यासाठी असणा-या प्रक्रियेचा खर्च या सहमत देशांना उचलावा लागतो. मग अशा वेळेस आपल्याशी सहमत असणारे देश थोडेसे मागे हटतात. तरीही मॉरिशस, फिजी, सुरिनाम अशा जेथे भारतीय वंशाचा समुदाय मोठ्या संख्येने राहतो, त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू, असे स्वराज यांनी सांगितले. "जर एखादे सरकारी पाहुणे इंग्रजी वगळून त्यांच्या देशाच्या भाषेत बोलत असले तर आम्ही सगळे हिंदीतच संवाद साधतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी परराष्ट्रमंत्री म्हणून संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलताना हिंदीतच बोललो, तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, आपले सर्व दूतावास, वाणिज्य दूतावास येथे हिंदीचा वापर वाढला आहे", असेही स्वराज यांनी स्पष्ट केले.यावर एका सदस्याने त्यांना संयुक्त राष्ट्राच्या प्रक्रियेसाठी ४० कोटी खर्च येतो असे सुचवताच स्वराज यांनी ४० कोटी काय आपण ४०० कोटी खर्च करण्यासही तयार आहोत असे उत्तरत सांगितले. काँग्रेसचे सदस्य शशी थरुर यांनी मात्र हिंदीला संयुक्त राष्ट्रात अधिकृत भाषा करण्याचा हट्ट कशाला असा प्रश्न विचारला. हिंदी ही भारताचीसुद्धा अधिकृत भाषा नाही तर ती कामकाजाची एक भाषा आहे, हे सांगताना त्यांनी गुजरात उच्च न्यायालायाच्या निर्णयाचा आधारही दिला. हिंदी ही केवळ भारतात बोलली जाते. मात्र अरबी भाषक हिंदी भाषकांपेक्षा कमी असूनही ती २२ देशांची भाषा आहे. परराष्ट्रमंत्री आणि पंतप्रधान जर तेथे संयुक्त राष्ट्रात हिंदीत बोलत असले तर त्याचा भाषांतराचा येणारा खर्च तेवढा आपण द्यावा. भविष्यात तमीळ भाषक पंतप्रधान किंवा परराष्ट्रमंत्री आले तर काय करणार ? असा प्रश्न थरूर यांनी विचारला. यावर उत्तर देताना स्वराज यांनी भारतासह मॉरिशस, फिजी, सुरिनामसारख्या अनेक देशांत हिंदीचा वापर होतो. पंतप्रधान जेव्हा परदेशात अनिवासी भारतीयांशी संवाद साधतात तेव्हा हिंदीतच बोलतात, असे सांगून इतर कोणत्याही देशात हिंदी बोलली जात नाही. असे म्हणणे हे केवळ अज्ञानाचे द्योतक आहे, असे उत्तर दिले. सुषमा स्वराज यांनी लोकसभेत सादर केलेल्या लेखी उत्तरात आपण इतर देशांशी या मुद्द्याबाबत संवाद साधत आहोत, असे नमूद केले आहे.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज