शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

नंदनवन झाले पुन्हा शांत! काश्मिरातील दहशतवादी हल्ल्यांत लक्षणीय घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 09:15 IST

अधिकाऱ्यांच्या मते जानेवारी २०२५ व जानेवारी २०२४ चे आकडे समान असले तरी गतवर्षी एक दहशतवादी ठार तर दोन जवान शहीद झाले होते.

-सुरेश एस डुग्गर श्रीनगर : जम्मू-काश्मिरात जानेवारी २०२५ मध्ये दहशतवादी हल्ल्यात केवळ तिघांचा मृत्यू झाला. दहशतवादी हल्ल्यांत लक्षणीय घट झाल्यामुळे गेल्या दोन दशकांमधील हे दुसरे वर्ष आहे, ज्याची सुरुवात शांततेत झाली. जानेवारीत दोन दहशतवादी हल्ल्यांत एक जवान व दोन दहशतवाद्यांसह तिघांचा मृत्यू झाला. २० जानेवारीला बारामुल्लातील दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला. त्यानंतर ३० जानेवारीला पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील चकमकीत घुसखोरी करणारे दोन दहशतवादी ठार झाले.

अधिकाऱ्यांच्या मते जानेवारी २०२५ व जानेवारी २०२४ चे आकडे समान असले तरी गतवर्षी एक दहशतवादी ठार तर दोन जवान शहीद झाले होते. या वर्षी मात्र दोन दहशतवादी ठार तर एक जवान शहीद झाला. २००० दशकाच्या मध्यात दहशतवादी हल्ल्यांची संख्या घटली होती.  

जानेवारी प्राणघातक महिना 

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २००१ मध्ये जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये २०३ मृत्यू झाले. २००२ मध्ये दहशतवादी हल्ल्यात २८८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अलीकडच्या इतिहासातील हा महिना सर्वांत प्राणघातक जानेवारी ठरला. जानेवारी २००० मध्ये दहशतवादी हल्ल्यात एकही हत्या वा मृत्यू झाला नव्हता. 

जम्मू-काश्मीर: ड्युटीवर परतणारा सैनिक बेपत्ता

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुट्ट्या संपवून ड्युटीवर घरी परतणारा  सैनिक बेपत्ता झाला आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, रायफलमन आबिद भट शनिवारी रंगरेथ लष्करी छावणीत कर्तव्यावर परतण्यासाठी अनंतनाग जिल्ह्यातील चित्तरगुल येथील आपल्या घरातून निघाले होते. भट्ट शनिवारी सकाळपर्यंत छावणीत पोहोचले नाहीत.

अतिरेकी कारवायांना चाप

गत पाच वर्षांत दहशतवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे हल्ल्यांतील बळींच्या संख्येत सरासरी ३४ वरून १६ पर्यंत घटली.

दहशतवादाला आळा घालण्यासाठीच्या एकत्रित प्रयत्नाच्या माध्यमातून दहशतवादाला खातपाणी घालणाऱ्या संस्था नष्ट करण्यात आल्या. दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा तसेच अमूर्त संपतीला लक्ष्य करण्यात आले. 

दहशतवाद्यांशी निगडित ७२ कर्मचाऱ्यांना कमल ३११ या अंतर्गत बडतर्फ करण्यात आले.

अवैधरीत्या चालवल्या जाणाऱ्या दहा संघटना व गटांवर बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा अर्थात यूएपीए या अंतर्गत बंदी घातली. यासोबत २२ लोकांना दहशतवादी घोषित करण्यात आली.

गेल्या पाच वर्षांत दहशतवादी संघटनेत भरती होणाऱ्या युवकांच्या संख्येतही मोठी घट झाली. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादtourismपर्यटनIndian Armyभारतीय जवान