शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

भाजपने साजरा केलेला लसोत्सव हा भंपकपणा- सिद्धरामय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 6:29 AM

२१ % लोकांनाच दोन्ही डोस

बंगलोर : देशात फक्त २९ कोटी नागरिकांना म्हणजे एकूण लोकसंख्येपैकी फक्त २१ टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. असे असतानाही नागरिकांना १०० कोटी डोस दिल्याचा भाजपने साजरा केलेला उत्सव हा भंपकपणा आहे, अशी टीका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी केली आहे. सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे की, देशात आजवर नागरिकांना १०० कोटी डोस दिले आहेत असे केंद्र सरकार सांगते; पण त्यांतील किती लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले व किती लोकांना अद्याप केवळ एकच डोस मिळाला, याचीही आकडेवारी सरकारने ठळकपणे जाहीर करायला हवी होती. देशातील १३९ कोटी जनतेपैकी फक्त २९ कोटी लोकांना दोन्ही डोस मिळणे, ही फार आदर्श स्थिती नाही. सिद्धरामय्या म्हणाले की,  देशातील फक्त २१ टक्के लोकांना दोन्ही डोस दिल्याबद्दलचा हा उत्सव आहे का? अमेरिकेत ५६ टक्के लोकांना लस देण्यात आली आहे. चीनमध्ये हे प्रमाण ७० टक्के आहे. त्या तुलनेत भारतामधील लसीकरणाचे प्रमाण खूपच कमी आहे. बूस्टर डोसचीही गरज भासू शकतेकर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, कोरोना साथ अजूनही पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. कोरोना लसीच्या दोन डोसनंतर कदाचित बूस्टर डोसचीही गरज लागू शकते. अजूनही अनेक लोकांनी कोरोना लसीचा पहिला किंवा दुसरा डोसही घेतलेला नाही. त्यामुळे उत्सव साजरे न करता लसीकरण मोहिमेवर केंद्र सरकारने अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस