शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

"अंत्यसंस्काराची व्यवस्था करा"; सिद्धरामय्या, कुमारस्वामी यांच्यासह 63 जणांना जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 15:59 IST

Siddaramaiah, 63 others in Karnataka getting death threats : माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सरकारला अशा प्रकारच्या धमक्यांना हलक्यात घेऊ नका, असा इशारा दिला आहे.

बंगळुरू : कर्नाटकातील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि प्रसिद्ध पुरोगामी साहित्यिक के. वीरभद्रप्पा यांच्यासह 64 जणांना जीवे मारण्याची धमकी देणारे मेसेज आले आहेत. हे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलीस विभागाने बंदोबस्त कडेकोट करण्याचा विचार केला आहे.

कर्नाटकात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये म्हटले आहे की, "तुमच्या अवतीभोवती मृत्यू लपला आहे, मरण्यासाठी तयार राहा. तुम्ही विनाशाच्या वाटेत आहात. मृत्यू तुमच्या अगदी जवळ आहे. तुम्ही तयार राहा. मृत्यू तुम्हाला कोणत्याही रूपात मारू शकतो. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कळवा आणि तुमच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करा". दरम्यान, मेसेज पाठवणाऱ्या अज्ञातांनी स्वत:ला सहिष्णू हिंदू असल्याचे म्हटले आहे. 

धमक्यांना हलक्यात घेऊ नका - एचडी कुमारस्वामी माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सरकारला अशा प्रकारच्या धमक्यांना हलक्यात घेऊ नका, असा इशारा दिला आहे. तसेच, सत्ताधारी भाजपावर निशाणा साधत पुरोगामी विचारवंत व लेखक के. वीरभद्रप्पा आणि राज्यातील जातीय ध्रुवीकरणावर सरकारच्या मौनाचा निषेध करणाऱ्या इतर लेखकांना सुरक्षा पुरवण्याचे आवाहन एचडी कुमारस्वामी यांनी केले आहे. 

राज्याच्या विकासाने चिंता निर्माण केली - कार्यकर्ताराज्याच्या विकासाने चिंता निर्माण केली असल्याचे कार्यकर्ते आणि लेखक प्रा. एम.एम यांनी म्हटले आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात  हिजाबचा वाद आणि मुस्लिम संघटनांनी केलेल्या निदर्शनानंतर हिंदू संघटनांनी मंदिरांमध्ये मुस्लिम व्यापारी, मुस्लिम मूर्तिकार, सामान्य व्यापारी आणि अगदी वाहनचालक आणि वाहतूक कंपन्यांनी बनवलेल्या मूर्तींवर बंदी घालण्याची विनंती केली. दरम्यान, या घडामोडींसाठी विरोधी पक्ष काँग्रेस आणि जेडी(एस) यांनी सत्ताधारी भाजपला जबाबदार धरले आहे. तसेच, समाजात अशांतता निर्माण करण्यासाठी हिंदू संघटनांना मदत आणि प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला आहे. 

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याkumarswamyकुमारस्वामीKarnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारी