शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे पहिले मतदार श्याम सरन नेगी यांना अखेरचा निरोप, हिमाचलमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 06:04 IST

भारताचे पहिले मतदार श्याम शरण नेगी यांचे शनिवारी सकाळी हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते १०६ वर्षांचे होते.

सिमला :

भारताचे पहिले मतदार श्याम शरण नेगी यांचे शनिवारी सकाळी हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते १०६ वर्षांचे होते. नेगी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना सलामी दिली. नेगी हे निवडणूक आयोगाचे सदिच्छादूत होते. नेगी यांच्या निधनाबद्दल निवडणूक आयोगाने दु:ख व्यक्त केले आहे. ते स्वतंत्र भारताचे पहिले मतदारच नव्हते, तर लोकशाहीवर अढळ श्रद्धा ठेवणारे नागरिक होते. त्यांनी लाखो लोकांना मतदानासाठी प्रेरित केले. त्यांनी मृत्यूपूर्वी २ नोव्हेंबर रोजी टपाल मतपत्रिकेद्वारे हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ साठी मतदान केले, असे ट्वीट आयोगाने केले आहे. मंडी जिल्ह्यातील सुंदरनगर येथील एका निवडणूक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेगी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. लोकशाहीप्रतीचा नेगी यांचा दृष्टिकोन देशातील तरुणांना प्रेरणा देईल, असे ते म्हणाले. 

असे बनले भारताचे पहिले मतदारफेब्रुवारी १९५२ मध्ये देशाची पहिली लोकसभा निवडणूक झाली. तेव्हा नेगी हे मुरांगच्या शाळेत शिक्षक होते. शिक्षकी पेशामुळे त्यांनाही निवडणुकीचे काम देण्यात आले होते. ड्यूटी शाँगथांगपासून मुरांगपर्यंत होती, तर त्यांचे मतदान कल्पा येथे होते. ते भल्या सकाळीच ते मतदान केंद्रावर पोहोचले. नेगी यांनी लवकर मतदान करू देण्याची विनंती केली. त्यानंतर ते ड्यूटीसाठी रवाना झाले. कल्पा येथे मतदान केल्याने पहिले मतदार म्हणून त्यांचे नाव नोंदले गेले.

टॅग्स :Votingमतदान