शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या 10व्या वर्षी झाला खटला! 43 वर्षे तारखेवर 'तारीख', अखेर 53व्या वर्षी मिळाला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 14:10 IST

बिहारमधील श्याम बिहारी सिंग यांना कोर्टाकडून 53 वर्षांनी न्याय मिळाला आहे

पाटणा : आयुष्यात कोर्ट, कचेरी आणि दवाखाना कोणाच्या वाट्याला येऊ नये असे बोलले जाते. याचाच प्रत्यय देणारी घटना बिहारमधील बक्सर जिल्ह्यात घडली आहे. कारण इथे एका व्यक्तीला आयुष्यातील 43 वर्षे कोर्टाची पायरी चढावी लागली. ही घटना बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील डुमराव पोलीस ठाण्याच्या परिसरातील आहे. जिथे चोंगई ब्लॉकचे रहिवासी श्याम बिहारी सिंग यांना तब्बल 43 वर्षांनंतर न्याय मिळाला. डुमरावमधील चोंगई येथे राहणारे श्याम बिहारी सिंग हे 10 वर्षे पाच महिन्यांचे असताना त्यांच्यावर खटला दाखल झाला होता. खरं तर सप्टेंबर 1998 मध्ये त्यांच्यांविरुद्ध डुमराव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 43 वर्षे खटला चालल्यानंतर त्यांना वयाच्या 53व्या वर्षी न्याय मिळाला आहे. 

43 वर्षे प्रतिक्षेत दरम्यान, तब्बल 43 वर्षे न्यायाच्या आशेने न्यायालयात गेलेल्या श्याम बिहारी सिंग यांना अखेर न्याय मिळाला आहे. श्याम बिहारी सिंग यांच्याविरोधात दुकानात हल्ला, गोळीबार आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यावेळी श्याम बिहारी हे अवघे साडे दहा वर्षांचे होते. पोलिसांनी श्याम बिहारी सिंग यांच्यावर जमावामध्ये सहभागी असल्याचा आरोप करून गुन्हा दाखल केला होता. बक्सर न्यायालयात हा खटला वर्षानुवर्षे चालत राहिला. अखेर त्यांना वयाच्या 53व्या वर्षी न्याय मिळाला आहे. 

कोर्टाकडून मोठा दिलासामंगळवारी श्याम बिहारी सिंग यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती डॉ. राजेश सिंग यांनी श्याम बिहारी हे दोषी नसल्याप्रकरणी त्यांची निर्दोष मुक्तता केली. आपला न्यायालयावर पूर्ण विश्वास असल्याचे श्याम बिहारी सिंग यांनी तेथील उपस्थित पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, "निकालाला उशीर होत आहे असे वाटायचे. पण उशिरा का होईना मला न्याय मिळेल असा विश्वास होता." तसेच ज्या आरोपातून मी स्वत:ला मुक्त करण्याची विनंती करत होतो. न्यायालयाने मला त्याच्यापासून मुक्त केले आहे. हा माझ्या आयुष्यातील अनमोल क्षण असल्याचे श्याम बिहारी सिंग यांनी सांगितले. 

श्याम बिहारी सिंग यांना न्याय मिळाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. तर त्यांच्या परिजनांनी त्यांच्या धैर्याचे आणि सहनशीलतेचे कौतुक केले आहे. न्यायासाठी त्यांनी 43 वर्षे कोणत्याही व्यत्ययाशिवाय वाट पाहिली. त्याचबरोबर या काळात त्यांनी पोलीस ठाण्यात किंवा कुठेही वकिली केली नाही, या त्यांच्या विश्वासालाही दाद द्यावी लागेल. श्याम बिहारी सिंग यांना नक्कीच न्याय मिळेल असा पूर्ण विश्वास असायचा. असे त्यांच्या परिसरातील नागरिकांनी म्हटले. 

 

 

टॅग्स :BiharबिहारCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी