शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

CoronaVirus Lockdown News: भारतात काही आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 12:01 IST

CoronaVirus Lockdown News: लॉकडाऊन केल्यास कोरोनाची साखळी तोडता येईल; आरोग्य सुविधा उभारता येतील; डॉ. अँथॉनी फाऊची यांचं मत

वॉशिंग्टन: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात अक्षरश: थैमान घातलं आहे. एप्रिलमध्ये कोरोनानं सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. आता मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं नवा विक्रम केला आहे. देशात पहिल्यांदा एकाच दिवसात कोरोनाचे ४ लाखाहून अधिक रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांचे प्रमुख आरोग्य सल्लागार असलेल्या डॉ. अँथॉनी फाऊची यांनी भारताला लॉकडाऊनची गरज असल्याचं म्हटलं आहे.VIDEO: माझी आई मरेल हो...! मुलगा ओरडत राहिला; पोलिसांनी VIPसाठी ऑक्सिजन सिलिंडर हिसकावलाभारतात काही दिवस लॉकडाऊन गरजेचा आहे. लॉकडाऊन केल्यास या कठीण काळात अत्यावश्यक पावलं उचलण्यास वेळ मिळेल, असं फाऊची यांनी म्हटलं. याशिवाय भारतानं लसीकणावरदेखील भर द्यायला हवा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. डॉ. अँथॉनी फाऊची यांनी इंग्रजी वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेसला एक मुलाखत दिली. भारतातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. ती सुधारण्यासाठी तत्काळ काही पावलं उचलणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.कोवॅक्सिननं भरलेला कंटेनर बेवारस स्थितीत सापडला; चालक-वाहक दोघेही गायबभारतातील सध्याची परिस्थिती पाहता ऑक्सिजन, औषधं, पीपीई आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करणं गरजेचं आहे. पण यासोबतच पूर्ण देशात लॉकडाऊनदेखील गरजेचा आहे, असं म्हणत फाऊचींनी चीनचं उदाहरण दिलं. 'भारतात ६ महिने लॉकडाऊन करण्याची आवश्यकता नाही. काही आठवड्यांचा लॉकडाऊन केल्यास कोरोनाची संक्रमणाची साखळी खंडित करता येईल. या कालावधीचा वापर कोरोना संकटाचा सामना करण्याच्या तयारीसाठी करता येईल,' असं फाऊची यांनी सांगितलं.डॉ. फाऊची यांचे भारताला सल्ले-- लोकांचं तत्काळ लसीकरण गरजेचं. यामुळे परिस्थिती लगेचच पूर्वपदावर येणार नाही. पण ते आवश्यक आहे.- ऑक्सिजन, औषधांच्या पुरवठ्यासाठी एका आपत्कालीन गटाची स्थापना गरजेची. हा गट याबद्दल नियोजन करेल. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची मदत घेता येईल.- लोकांच्या उपचारांसाठी आपत्कालीन रुग्णालय तयार करण्याची गरज. लोकांना रुग्णालयांची गरज असल्याचं टीव्हीवरील दृश्य पाहून जाणवत आहे.- सरकारनं विविध गटांना सोबत आणायला हवं. युद्ध काळात उभारली जातात, तशी फिल्ड रुग्णालयं उभारायला हवीत. - काही आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा. त्यामुळे कोरोना संक्रमणाची श्रृंखला तोडता येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या