शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘शुभमंगल’ ४ लाख काेटींवर; यावर्षी सनईचाैघड्यांची उलाढाल वाढणार, प्रतिविवाह काेट्यवधींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 07:11 IST

लग्नाची खरेदी, सजावट, भाेजनव्यवस्था, सभागृहे तसेच विविध प्रकारच्या सेवांच्या माध्यमातून यंदा तब्बल ४.२५ लाख काेटी रुपयांची उलाढाल हाेण्याचा अंदाज आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सणासुदीनंतर देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरू हाेणार आहे. देशभरात यंदाच्या हंगामात तब्बल ३५ लाख लग्न हाेण्याचा अंदाज असून आतपासूनच सर्वांची लगीनघाई सुरू झाली आहे. 

लग्नाची खरेदी, सजावट, भाेजनव्यवस्था, सभागृहे तसेच विविध प्रकारच्या सेवांच्या माध्यमातून यंदा तब्बल ४.२५ लाख काेटी रुपयांची उलाढाल हाेण्याचा अंदाज आहे. सणासुदीची खरेदी, लग्नावर हाेणारे खर्च इत्यादींमुळे चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी विकासदर वाढून ६.५ ते ६.८ टक्के राहू शकताे, असा अंदाज आहे.

यावर्षी २३ नाेव्हेंबरनंतर लग्नाचा हंगाम सुरू हाेणार आहे. साधारणत: जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहणाऱ्या हंगामात ३५ लाखांपेक्षा जास्त विवाह समारंभ हाेणार आहेत. यासाठी देशभरात विविध क्षेत्रातील व्यापारीही सज्ज झाले आहेत. २० प्रमुख शहरांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले. जवळपास २ लाख विवाह दिल्ली आणि मुंबईसारख्या मेट्राे शहरांमध्येच हाेण्याचा अंदाज आहे. सुमारे २ लाख काेटी रुपयांची उलाढाल या शहरांतून हाेईल.

लग्नासाठी अशी हाेते खरेदीघरांची दुरूस्ती, रंगरंगाेटी, दागिन्यांची खरेदी, लग्नासाठी आवश्यक वस्त्रे, जाेडे, आमंत्रण पत्रिका, सुका मेवा, मिठाई, फळे, पूजा साहित्य, किरणा, सजावटीचे सामान, भेटवस्तू, किरणा, वाहने इत्यादींवर प्रचंड खर्च हाेताे. 

या सेवांवर हाेताे खर्चलग्नासाठी काही सेवा महत्त्वाच्या असतात. त्यात सभागृह, लाॅन, मंडप, खानपान सेवा, स्वागत, सनई, बॅंडबाजा, फाेटाेग्राफर, व्हिडीओग्राफर, घाेडे, बग्गी, राेषणाई इत्यादींवर प्रमुख भर असताे. 

एका विवाहात एवढा खर्च!६ लाख लग्नांमध्ये प्रतिविवाह ३ लाख रुपये१० लाख लग्नांमध्ये प्रतिविवाह ६ लाख रुपये१२ लाख लग्नांमध्ये प्रतिविवाह १० लाख रुपये६ लाख लग्नांमध्ये  प्रतिविवाह २५ लाख रुपये५० हजार लग्नांत ५० लाखांचा खर्च५० हजार लग्नांत  प्रतिविवाह १ काेटी रुपयांचा खर्च.

सणासुदीत खिशावर भारलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सणासुदीच्या हंगामासोबतच सुट्या सुरू झाल्यामुळे लोक प्रवास व पर्यटनासाठी बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे हवाई प्रवास भाडे आणि हॉटेलांचे भाडे यांत जबरदस्त वाढ झाली आहे.दिवाळीसाठी १० ते १६ नोव्हेंबर या कालावधीत देशातील प्रमुख स्थानांसाठी हवाई भाडे ४४ टक्के वाढले आहे. देशातील हवाई प्रवास क्षमता कमी झाली आहे. वाढलेली मागणी आणि प्रवासी वाहतूक क्षमतेतील कमतरता यामुळे ही भाडेवाढ झाली आहे. 

८,७८८ : सरासरी भाडे मुंबई - दिल्ली मार्गावरील दिवाळीच्या आठवड्यातील आहे. 

टॅग्स :marriageलग्न