शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

मुलांनी ८० कोटींची प्रॉपर्टी बळकावली; वडिलांचा वृद्धाश्रमात मृत्यू, अंत्यसंस्कारास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 12:07 IST

एक मुलगा बिझनेसमन आहे आणि मुलगी सर्वोच्च न्यायालयात वकील आहे. त्यांच्या मुलांनी त्यांच्याकडून कोट्यवधींची संपत्ती हिसकावून घेतली आणि ते आजारी पडल्यावर त्यांना असंच रस्त्यावर सोडल्याचं म्हटलं जात आहे.

वाराणसीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध साहित्यिक श्रीनाथ खंडेलवाल यांनी वृद्धाश्रमामध्ये अखेरचा श्वास घेतला. खंडेलवाल यांचे कुटुंबीयही आहेत पण त्यांच्या शेवटच्या क्षणी कोणीही आलं नाही, मुलगा बिझनेसमन आणि मुलगी वकील आहे. कोट्यवधींची पॉपर्टी असून देखील श्रीनाथ खंडेलवाल यांनी वृद्धाश्रमात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी शेकडो पुस्तकं लिहिली आहेत. 

श्रीनाथ खंडेलवाल यांचं मोठं कुटुंब आहे. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. त्यांचा एक मुलगा बिझनेसमन आहे आणि मुलगी सर्वोच्च न्यायालयात वकील आहे. त्यांच्या मुलांनी त्यांच्याकडून कोट्यवधींची संपत्ती हिसकावून घेतली आणि ते आजारी पडल्यावर त्यांना असंच रस्त्यावर सोडल्याचं म्हटलं जात आहे. यानंतर सामाजिक कार्यकर्ते अमन पुढे आले आणि त्यांनी त्यांना काशी कुष्ठरोग वृद्धाश्रमात ठेवलं. 

वृद्धाश्रमात ते सुमारे दहा महिने राहिले आणि तेथे त्यांना मोफत सेवा देण्यात आली पण एकदाही कुटुंबातील कोणीही आलं नाही. त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली नाही. कोट्यवधींचे मालक आणि २०२३ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अध्यात्मिक साहित्यकाराच्या मृत्यूनंतरही नातेवाईक आले नाही. त्यांनी येण्यास स्पष्ट नकार दिला. शेवटी समाजसेवक अमन यांनी देणगी गोळा करून अंत्यसंस्कार केले.

वाराणसीस्थित साहित्यिक श्रीनाथ खंडेलवाल यांचं शनिवारी निधन झालं. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीनाथ खंडेलवाल यांनी सुमारे ४०० पुस्तकं लिहिली आणि अनुवादित केली आणि ८० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक होते. सारनाथ येथील काशीकुष्ट सेवा संघ वृद्धाश्रमात बराच काळ वास्तव्य करत होते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची मुलं अंत्यदर्शनासाठी आली नाहीत. एनडीटीव्ही हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Varanasiवाराणसी