जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये 29-30 ऑगस्टला रात्री उशिरा दहशतवाद्यांनी स्थानिक पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गस्ती पथकावर हल्ला केला. यानंतर सुरू झालेल्या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. जम्मू-काश्मीर पोलिसांचे सहाय्यक उपनिरीक्षकही चकमकीत शहीद झाले.श्रीनगर जिल्ह्यातील पंथ चौक भागात ही चकमक झाली. यासंदर्भात एका पोलीस अधिका-याने सांगितले की, खात्मा करण्यात आलेल्या अतिरेक्यांचे मृतदेह सापडले आहेत. ठार झालेल्या अतिरेक्यांकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार एन्काऊंटर संपला आहे. तिन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर हल्ला, चकमकीत तीन दहशतवादी ठार, एक जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 08:56 IST