शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

श्री बळी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

By admin | Updated: December 13, 2015 00:07 IST

फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात शोभायात्रा

फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात शोभायात्रा
नाशिक : मुंबई महामार्गावरील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या श्री बळी महाराज मंदिरात बळी महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त परिसरातून फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली.
मुंबई महामार्गावरील अति प्राचीन श्री बळी महाराज मंदिर रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे हे मंदिर रस्त्याच्या अगदी मधोमध आले होते. यामुळे या बळी महाराज मंदिरात देवदर्शन घ्यायला मोठी अडचण निर्माण होत होती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या नियमाप्रमाणे महामार्गावर धार्मिक स्थळे नसावी, असा नियम आहे. त्याप्रमाणे अमर मित्रमंडळ आणि श्री बळी महाराज देवस्थानच्या पदाधिकार्‍यांनी हे मंदिर स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आणि जवळच असलेल्या मोकळ्या जागेत प्रशस्त नवीन मंदिर उभारण्यात आले. या मंदिराचा जीर्णोद्धार आणि श्री बळी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शुक्रवार (दि.१२) सकाळी नऊ वाजता जुन्या बळी मंदिरापासून भव्य सवाद्य मिरवणुकीने व फटाक्यांच्या आतषबाजीत व ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येऊन मिरवणुकीनंतर श्री बळी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधीवत पूजापाठ करून करण्यात आली. या शोभायात्रेत महिला भाविकांनी कपाळावर तुळशी घेतली होती. तसेच मिरवणूक मार्गावर भाविकांनी आकर्षक रांगोळ्या काढून मिरवणूक मार्ग सजविण्यात आला होता. या मिरवणुकीत बहुतांश जय जर्नादन भक्त परिवार सहभागी झाला होता. शोभायात्रेनंतर लगेचच महायज्ञाला प्रारंभ करण्यात आला. दीड दिवस चालणार्‍या या महायज्ञाला १२ जोडप्यांनी पूजाविधीत सहभाग घेतला. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, पंचवटी प्रभाग सभापती सुनीता शिंदे, श्री बळी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष बाळूमामा शिंदे यांच्यासह शेकडो भाविक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
फोटो कॅप्शन-
१२ पीएचडीसी-७० - श्री बळी महाराज मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक.