शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

"मला तुमच्या सर्वांची आठवण येते, स्वप्न पूर्ण करूनच परत येईन..."; श्रेयाचा आईला शेवटचा कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 15:32 IST

श्रेयाच्या आईने बेसमेंटमध्ये असलेल्या कोचिंगवर प्रश्न उपस्थित करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दिल्लीतील राजेंद्र नगर कोचिंग दुर्घटनेत उत्तर प्रदेशच्या श्रेया यादवला आपला जीव गमवावा लागला आहे. IAS बनण्यासाठी गेलेल्या श्रेयाचा मृतदेह घरी आल्यावर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. श्रेयाच्या आईची रडून रडून अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. श्रेयाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या एक दिवस आधी मुलीशी फोनवर बोलणं झालं होतं. त्यावेळी मुलीने मला तुमच्या सर्वांची आठवण येते असं म्हटलं. तसेच सर्वांची चौकशी देखील केली. स्वप्न पूर्ण करून घरी परत येणार असल्याचं सांगितलं.

श्रेयाच्या आईने बेसमेंटमध्ये असलेल्या कोचिंगवर प्रश्न उपस्थित करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. "मुलीने मी आयएएस होऊनच येणार असल्याचं सांगितलं होतं, पण कोणाला माहीत होतं की पुढे हे असं होणार आहे. आमची मुलगी आम्हाला सोडून गेली. यापेक्षा मोठं दु:ख काय असू शकतं?" असं श्रेयाच्या आईने म्हटलं आहे. 

राजेंद्र नगर येथील कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, त्यात आंबेडकर नगरमधील श्रेयाचाही समावेश होता. सोमवारी सकाळी विद्यार्थिनी श्रेया यादवच्या मृतदेहावर तिच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी श्रेयाच्या हसिमपूर बरसावन गावात मोठ्या संख्येने लोक जमले होते. 

श्रेया यादवची पुस्तकं, नोट्स तिच्या घरात पडून आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य सांगत आहेत की, मुलीचं आयएएस होण्याचं स्वप्न होतं, परंतु निष्काळजीपणानमुळे तिला जीव गमवावा लागला आहे. श्रेयाच्या मावशीने सांगितलं की, श्रेया ऑफिसर होण्यासाठी गेली होती. आता सगळी स्वप्नं गेली. ती अभ्यासात खूप हुशार होती. मी छोटी नोकरी करणार नाही असं ती नेहमी म्हणायची. श्रेयाने एप्रिलमध्ये कोचिंग क्लास जॉईन केला होता.   

टॅग्स :delhiदिल्लीRainपाऊस