शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कलियुगातील श्रावणबाळ; खांद्यावरील कावडीत आई-वडिलांना बसवून ४० किलोमीटरची पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 11:02 IST

कलियुगात पुन्हा एकदा एक श्रावणबाळ सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे.

ठळक मुद्देकलियुगात पुन्हा एकदा एक श्रावणबाळ सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे. आई-वडिलांचे डोळे मिटण्याआधी कायद्याच्या नजरेत आपण निर्दोष होतो, हे सिद्ध करण्यासाठी ओडिशातील एका व्यक्तीचा संघर्ष सुरु आहे

मयुरभंज, दि. 1- खांद्यावर कावड घेऊन आई-वडिलांना देवदर्शनाला घेऊन गेलेल्या श्रावण बाळाची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. लहानपणी अनेकदा प्रत्येकाने ही गोष्ट ऐकली असेलच. पण आता कलियुगात पुन्हा एकदा एक श्रावणबाळ सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे.  पोलिसांकडून दाखल झालेला खोटा गुन्हा, न्याय व्यवस्थेकडून न्याय मिळायला होणारा उशिर आणि ग्रामस्थांनी वाळीत टाकल्याने ओडिशातील एका व्यक्तीवर श्रावण बाळ होण्याची वेळ आली आहे. आई-वडिलांचे डोळे मिटण्याआधी कायद्याच्या नजरेत आपण निर्दोष होतो, हे सिद्ध करण्यासाठी ओडिशातील एका व्यक्तीचा संघर्ष सुरु आहे.

ओडिशाच्या मयुरभंज जिल्ह्यातील मोरोदा गावातील कार्तिक सिंह यांनी त्यांच्या विरोधात पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. आता हे प्रकरण कोर्टात गेल्याने आणि हातात पैसा नसल्याने खांद्यावर कावड घेऊन, त्यात आई-वडिलांना बसवून तब्बल ४० किलोमीटरची पायपीट करण्याची वेळ कार्तिक यांच्यावर आली. कार्तिक यांच्याविरोधात २००९ मध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यासाठी त्यांना १८ दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.

कार्तिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांना ग्रामस्थांनी त्यांना वाळीत टाकलं. ‘माझ्याकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही. गावातील लोकांकडून कोणतंही काम दिलं जात नाही. आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी घरात कोणीही नसल्याने नोकरीसाठी शहरातही जाता येत नाही’असं कार्तिक यांनी सांगितलं आहे. सुनावणीसाठी कोर्टात गेल्यावर घरात आई-वडिलांची काळजी कोण घेणार, असा प्रश्न कार्तिक यांच्यासमोर निर्माण होतो. म्हणूनच ते आपल्या आई-वडिलांना कावडीत बसवून तब्बल ४० किलोमीटरची पायपीट करतात.खोटा गुन्हा दाखल झालेले कार्तिक सुशिक्षित आहेत. पण ६ ते ७ वर्षांपासून गुन्हा दाखल असल्याने तसंच त्या प्रकरणाचा अजूनही निकाल न लागल्याने नोकरी मिळत नसल्याचं  ते सांगतात. याच कारणामुळे त्यांचं अजून लग्न झालेलं नाही.ओडिशाच्या मयुरभंज जिल्ह्यात असे अनेकजण असल्याचं वकील प्रभूदान मरांडी यांचं म्हणणं आहे. कार्तिक यांच्याबरोबर जे झालं ते याआधीही अनेकांसोबत झालं आहे. अनेकांच्या विरोधात खोटे गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचं मरांडी यांनी सांगितलं. मयुरभंज पोलिसांनी याआधीही अनेकांच्या विरोधात खोटे गुन्हा दाखल केले आहेत. पोलिसांच्या या खोट्या गुन्ह्याची शिक्षा अनेकांना भोगावी लागली आहे, असंही वकिलांनी सांगितलं.