शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

गुन्ह्यांचा रहस्यभेद करते नार्काे, नेमकी कशी असते ही चाचणी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 06:56 IST

नार्काे चाचणी हा प्रकार फाॅरेन्सिक सायकाॅलाॅजीमध्ये येताे. विज्ञान व तंत्रज्ञानाचा न्यायदानासाठी केलेला वापर म्हणजे फाॅरेन्सिक विज्ञान. त्यातील ही एक शाखा आहे.

मनोज रमेश जोशी, वृत्त संपादकनेकदा गंभीर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांसमोर मार्ग सापडत नाही. बरेच गुन्हेगार खूप हुशार असतात. गुन्हा कसा लपवता येईल, पुरावे कसे मिटवता येतील, याचा खूप अभ्यास करतात. योजना आखून योग्य वेळेवर डाव साधतात. अशा प्रकरणांचा तपास करणे पोलिसांसमोर खूप मोठे आव्हान असते. तपास खूप गुंतागुंतीचा होतो. अशावेळी हा गुंता सोडविण्यासाठी मदत घेतली जाते फॉरेन्सिक विज्ञानाची. आपण टीव्ही मालिका किंवा चित्रपटांमध्ये डीएनए, फिंगरप्रिंट्स इत्यादी शब्द ऐकले असतील, पाहिलेही असतील. त्यात अजून एक प्रकार येतो तो म्हणजे नार्को चाचणी. असं म्हणतात गुन्हेगार कितीही कुख्यात असला तरी तो या चाचणीत बरेच भेद उघड करतो आणि तपासाला नवी दिशा देतो. सध्या श्रद्धा वालकर प्रकरणावरून नार्को चाचणीची चर्चा सुरू आहे. तिचा निर्दयी खून केल्याचा आरोप असलेला आफताब याची नार्को चाचणी करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.

नार्को चाचणी का केली जाते?गुन्हेगाराला बोलते करण्यासाठी या चाचणीचा आधार घेतला जातो. मात्र, गुन्हेगार अचेतन किंवा अर्धवट शुद्धीवर असतो. काही पुरावे, माहिती, नोंदविलेल्या साक्षी इत्यादींमध्ये काही मिसिंग लिंक जोडल्या जातात. गुन्हा कसा केला, का केला, पुरावे कसे नष्ट केले इत्यादी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न असतो. 

चाचणी आराेपीच्या संमतीनेचनार्काे चाचणीतील माहिती, कबुलीजबाब हा न्यायालयात पुरावा म्हणून मान्य केला जात नाही. आराेपीची संमतीही या चाचणीसाठी घ्यावी लागते. आराेपीवर ती लादता येत नाही. आराेपीची संमती आहे, हे न्यायालयाला सांगितल्यानंतरच न्यायालय तशी परवानगी देते.

आराेपपत्रात नार्काेचा उल्लेख करता येत नाहीपरिस्थितीजन्य व पुष्टीदायक पुरावे गाेळा करण्यासाठी नार्काे चाचणीचा उपयाेग हाेताे. त्यामुळे तपासाच्या दृष्टिकाेनातून या चाचण्या खूप महत्त्वाच्या ठरतात.  परंतु, या चाचण्यांच्या निष्कर्षांना न्यायालयात पुरावा म्हणून मान्यता नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नार्काे चाचणीच्या आधारे पुरावे गाेळा केले, हे आराेपपत्रात लिहू शकत नाही.- शिरीष इनामदार, निवृत्त अपर उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र

पाॅलिग्राफ चाचणीश्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आराेपी आफताबची ही चाचणी करण्यात आली.  काेणत्याही घटनेला मानवाच्या भावनात्मक प्रतिक्रिया उमटतात. भय, संताप, प्रेम, इगाे, आनंद, धाडस, दु:ख इत्यादी. हे तसेच शरीरातील रक्तदाब, हृदयाचे ठाेके, श्वासाेच्छ्वासाची गती, नाडीचे ठाेके, इलेक्ट्रिकल प्रतिक्रिया, आवाजातील बदल हे पाॅलिग्राफ चाचणीद्वारे हेरले जातात. 

कशी करतात चाचणी?आरोपीला काही औषधे दिली जातात. त्यानंतर तो अचेतन अवस्थेत जातो. त्यापूर्वी आराेपीच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात येतात. त्यानंतरच चाचणी करण्यात येते.सोडियम पेंटोथल, स्कोपोलमाइन किंवा सोडियम अमाईटल या औषधांचे इंजेक्शन दिले जाते. त्यांना ट्रूथ ड्रग असेही म्हणतात. आरोपीचे वय, वजन, इत्यादी गोष्टी विचारात घेऊन औषधांचा डोस ठरविला जातो. डाेस जास्त झाल्यास आराेपीवर दुष्परिणाम हाेऊ शकतात.

ब्रेनमॅपिंग चाचणीत मेंदूतून अशा लहरी निर्माण हाेतात. लाल आणि निळ्या रेषा समांतर आल्या, तर आराेपीला गुन्ह्याबद्दल माहिती असते.

दाेन्ही रेषा लाल रेषेपासून दूर असल्यास आराेपीला गुन्ह्याबाबत माहिती नसल्याचे संकेत मानले जातात.

ब्रेन मॅपिंग या चाचणीसाठी ‘पी-३०० मर्मर’ नावाचे यंत्र वापरले जाते. आराेपीच्या डाेक्यावर ते लावण्यात येते. घटनेशी किंवा पीडित व्यक्तीशी संबंधित छायाचित्रे, व्हिडीओ, आवाज इत्यादी दाखविण्यात येतात, ऐेकविण्यात येतात. त्यावर आराेपीच्या मेंदूमधील इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीमध्ये हाेणारे बदल हेरले जातात. आराेपीचा त्याच्याशी संबंध जाेडून तपासाला दिशा मिळते. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरPoliceपोलिस