शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Shraddha Murder Case: आफताबच्या नार्को टेस्टला परवानगी, पाेलिस करणार क्राईम सीन रिक्रिएशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 07:45 IST

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची पोलिस कोठडी गुरुवारी ५ दिवसांनी वाढवत दिल्लीच्या एका न्यायालयाने शहर पोलिसांना त्याच्या ‘नार्को टेस्ट’ची परवानगी दिली.

नवी दिल्ली/नालासोपारा : श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची पोलिस कोठडी गुरुवारी ५ दिवसांनी वाढवत दिल्लीच्या एका न्यायालयाने शहर पोलिसांना त्याच्या ‘नार्को टेस्ट’ची परवानगी दिली. तसेच क्राइम सीन रिक्रिएट करण्यासाठी पाेलिस त्याला हिमाचल प्रदेशमध्येही नेऊ शकतात. 

आरोपी दिशाभूल करत असल्याने पोलिसांनी नार्को टेस्टसाठी परवानगी मागितली होती. या टेस्टमुळे पोलिसांना या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यास मदत होईल. आफताबच्या फ्लॅटवर आढळलेले रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ते मानवी रक्त असल्याचे निष्पन्न झाल्यास श्रद्धाच्या वडिलांची डीएनए चाचणी करण्यात येईल. पूनावाला याने कथितरित्या श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केला व तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते एक एक करून शहराच्या अनेक भागात फेकून दिले, असा आरोप आहे. 

आफताबला फाशीच द्या : डॉ. नीलम गोऱ्हेn श्रद्धा वालकर (वय २७) हिच्या कुटुंबाची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी दुपारी भेट घेतली. दरम्यान, कोर्टात लवकरात लवकर खटला चालवून आरोपीला फाशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. n यावेळी श्रद्धाचे वडील पहिल्यांदा मीडियासमोर आले. n पण त्यांनी या प्रकरणावर मला काही बोलायचे नसून मीडियापासून मी लांब बरा आहे, असे उपस्थित पत्रकारांना सांगितले.

बांगलादेशातही पुनरावृत्तीबांगलादेशातील खुलना येथे श्रद्धा वालकरसारखी खुनाची घटना समोर आली आहे. येथे एका विवाहित व्यक्तीने प्रेयसीच्या हत्येनंतर तिच्या शरीराचे तीन तुकडे करून ते नाल्यात फेकून दिले.कविता असे मृत तरुणीचे, तर अबू बकर असे आरोपीचे नाव आहे. अबूने विवाहित असल्याचे तिच्यापासून लपवून ठेवले होते. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारी