शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मी पद्म पुरस्कार परत करावा का? प्रकाश आमटे यांचा सवाल; हेमलकसातील प्राणी ‘अनाथ’ होण्याची वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 05:55 IST

डॉ. प्रकाश आमटे यांचा ज्या कार्याबद्दल ‘पद्मश्री’ देऊन सन्मान झाला, त्यावरच नोकरशहांची वक्रदृष्टी पडल्याने हेमलकसातील प्राण्यांवर ‘अनाथ’ व्हायची वेळ आली आहे.

- विकास झाडेनवी दिल्ली : डॉ. प्रकाश आमटे यांचा ज्या कार्याबद्दल ‘पद्मश्री’ देऊन सन्मान झाला, त्यावरच नोकरशहांची वक्रदृष्टी पडल्याने हेमलकसातील प्राण्यांवर ‘अनाथ’ व्हायची वेळ आली आहे.डॉ. प्रकाश आमटे व पत्नी डॉ. मंदाकिनी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा-भामरागड भागात आदिवासींची सेवा करतात. त्यांना मॅगेसेसे पुरस्कार मिळाला आहे. प्रकाश आमटे यांनी आदिवासींना अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध करून दिला. त्यामुळे येथील लोकांच्या अंगावर कपडे आले, आरोग्य जागृती निर्माण झाली.डॉ. आमटे दाम्पत्याने प्राण्यांचेही पितृत्व स्वीकारले. जखमी प्राण्यांचे अनाथालय उभारले. शंभरावर प्राणी येथे आहेत. परंतु प्राण्यांचे अनाथालय कसे असू शकते, असा प्रश्न वन अधिकाºयांना पडला व प्राण्यांचा सांभाळ बेकायदेशीर असल्याचे कळवले. अनाथालय बंद करा, प्राण्यांना जंगलात सोडा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करू, असा दम भरण्यात आला. वन्यजीव समितीपुढे ते आपले म्हणणे मांडणार आहेत....तर प्राणी मरतील : उपचारासाठी, शिकारीतील मरण टाळण्यासाठी आणलेले प्राणी येथे वाढले. त्यांना शिकार कशी करायची, हे माहीत नाही. जंगलात वावरण्याची सवय नाही. ते १५ ते २० वर्षांचे आहेत. अनाथालय बंद केल्यास प्राण्यांची जबाबदारी कोण घेणार? आठवडाभरातच ते मरतील. मला ज्या कार्यासाठी सरकारने पद्म पुरस्कार दिला, त्याविरोधात धोरण आहे. त्यामुळे मला हा पुरस्कार परत करायची भूमिका घ्यावी लागेल. - डॉ. प्रकाश आमटेआमटे कुटुंब देशाचेवैभव आहे. डॉ. प्रकाश आमटे पत्नीसह जंगलात राहिले. त्यांनी प्राण्यांवर प्रेम केले. प्राण्यांसाठीचे नियम कठोर असले तरी परिस्थितीचा विचार व्हायला हवा. -हंसराज अहीर, केंद्रीय गृह राज्यमंत्री

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र