'26/11च्या हल्ल्यानंतर अशी भूमिका घ्यायला हवी होती'

By admin | Published: September 29, 2016 05:18 PM2016-09-29T17:18:53+5:302016-09-29T17:18:53+5:30

भारताने पाकिस्तानने केलेल्या उरी हल्ल्यानंतर आता घेतलेली भूमिका ही २६/११ च्या हल्ल्यानंतरच घ्यायला हवी होती.

Should have played such role after the 26/11 attacks' | '26/11च्या हल्ल्यानंतर अशी भूमिका घ्यायला हवी होती'

'26/11च्या हल्ल्यानंतर अशी भूमिका घ्यायला हवी होती'

Next

-सुधीर जटार

भारताने पाकिस्तानने केलेल्या उरी हल्ल्यानंतर आता घेतलेली भूमिका ही २६/११ च्या हल्ल्यानंतरच घ्यायला हवी होती. त्यामुळे आता यासाठी उशीर झाला असे म्हणत असतानाच हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. भारतीय सैन्य अशा प्रकारच्या कारवाईसाठी कायम तयार असते. परंतु आतापर्यंत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसत आला आहे. आतापर्यंत शत्रू सैन्याने आपल्या एका गालात मारली तर आपण दुसरा गाल पुढे करत होतो, मात्र ही भूमिका अतिशय चुकीची आणि देशासाठी घातक ठरली आहे.
आता भारताने घेतलेल्या भूमिकेमुळे भारताचा मान देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावरही निश्चितच वाढणार आहे. येत्या काळातही भारताने आता स्वीकारलेले धोरण कायम ठेवल्यास ते निश्चितच फायदेशीर ठरू शकेल. आताही भारताने घेतलेल्या भूमिकेत आंतरराष्ट्रीय सीमा पार केलेल्या नसून केवळ नियंत्रण रेषा पार केली आहे. यातही आपण आता पाकिस्तानवर हल्ला केला नसून दहशतवाद्यांवर हल्ला केला आहे हे समजून घ्यायला हवे. हे दहशतवादी तालिबान आणि अल कायद्याचे असल्याचे याआधीही अनेकदा स्पष्ट झाले आहे. मात्र आताच्या कारवाईत दोन पाकिस्तानी अतिरेकी कसे सापाडले हा प्रश्न आहे. त्यामुळे हे पाकिस्तानी अतिरेकी या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत नव्हते ना हेही पहायला हवे.
त्यामुळे दहशतवादी भारताला वारंवार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही भारताने आपली भूमिका मागे न घेता त्यावर ठाम रहायला हवे. येत्या काळात कारगिलप्रमाणे युद्ध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र भारतीय सैन्याने आता अतिशय दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. काश्मिरमध्ये ज्या भागात आता कारवाया चालू आहेत तो भाग अतिशय जोखमीचा असून अतिशय काळजीपूर्वक पाऊले टाकावी लागणार आहेत. लेखक संरक्षण विषयातील तज्ज्ञ असून त्यांनी १९७७ ते ८१ या काळात काश्मिर खोऱ्यातील सैन्यात त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आाहे. तसेच १९७१ मध्ये जम्मू- काश्मीर येथील पूंच येथे झालेल्या युद्धातही त्यांचा सहभाग होता. संरक्षण विषयातील अनेक शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही ते मागील अनेक वर्षांपासून करत आहेत.

- लेखक संरक्षण विषयातील तज्ज्ञ आणि मेजर जनरल(निवृत्त) आहेत
 

Web Title: Should have played such role after the 26/11 attacks'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.