आपल्याला लाज वाटली पाहिजे; औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेवरून राहुल गांधी उद्विग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 11:07 AM2020-05-08T11:07:56+5:302020-05-08T11:26:00+5:30

घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असताना मालगाडीने त्यांना चिरडले.

should be ashamed; Rahul Gandhi's target Modi over Aurangabad tragedy | आपल्याला लाज वाटली पाहिजे; औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेवरून राहुल गांधी उद्विग्न

आपल्याला लाज वाटली पाहिजे; औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेवरून राहुल गांधी उद्विग्न

Next

नवी दिल्लीः औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नाव न घेता मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडले गेल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून, ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असताना मालगाडीने त्यांना चिरडले. यात १६ जण ठार, तर २ मजूर जखमी झाले. या अपघाताबाबत राहुल गांधींनी दुःख व्यक्त केलं आहे. 

रेल्वे अपघातात मजूर भाऊ-बहिणींच्या मृत्यूच्या बातमीनं मी दुःखी आहे. राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कामगारांबरोबर होत असलेल्या व्यवहारावर आपल्याला लाज वाटली पाहिजे. मृत मजुरांच्या कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. तसेच  या प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली असून, रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली आहे. तसेच या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचंही मोदी म्हणाले आहेत. आवश्यक मदत केली जाईल, असंही आश्वासन मोदींनी दिलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील एका कंपनीत मध्य प्रदेश येथील १९ मजूर काम करतात. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हे मजूर जालना येथे अडकले गेले. दरम्यान, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत, अशी माहिती या मजुरांना मिळाली. तसेच भुसावळ येथून मध्य प्रदेशला रेल्वे जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. पहाटे अचानक एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली. काही कळायच्या आत १६ मजूर रेल्वे खाली चिरडले गेले, तर दोघे गंभीर जखमी असून तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत. धर्मेंद्र सिंह(२०), ब्रिजेंद्र सिंह(२०), निर्बेश सिंह (२०), धन सिंह (२५), प्रदीप सिंह, राज भवन, शिव दयाल, नेमसहाय सिंह, मुनिम सिंह, बुधराज सिंह, अचेलाल, रविंद्र सिंह या मजुरांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतून बचावलेल्या मजुराने सांगितलं नेमकं काय घडलं!

Coronavirus: औरंगाबादमधील रेल्वे अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल; रेल्वे मंत्र्यांना दिल्या सूचना

लॉकडाऊनची भीषणता! औरंगाबादजवळ रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठार

'गावी जाऊ इच्छिणाऱ्या, शहरात अडकलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी मोफत होणार'

Coronavirus: आता पोस्टानं होणार कोरोना टेस्टिंग किट्सची डिलिव्हरी; ICMRनं केला करार

Coronavirus: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची भीती, खासगी नोकर निघाला संक्रमित

Web Title: should be ashamed; Rahul Gandhi's target Modi over Aurangabad tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.