शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

नोटांचा तुटवडा, जनता संतप्त!

By admin | Updated: November 12, 2016 04:41 IST

जुन्या नोटा बदलून नव्या नोटा देणार, ही सरकारची घोषणा पूर्णपणे फसवी ठरली असून, शुक्रवारी अनेक बँकांमध्ये १00 रुपयांच्या पुरेशा नोटाच न आल्याने ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

पर्यायी व्यवस्था करणे शक्य नसताना, घाईघाईने पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्दच का केल्या?नवी दिल्ली : जुन्या नोटा बदलून नव्या नोटा देणार, ही सरकारची घोषणा पूर्णपणे फसवी ठरली असून, शुक्रवारी अनेक बँकांमध्ये १00 रुपयांच्या पुरेशा नोटाच न आल्याने ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. काही ठिकाणी केवळ दोन हजार रुपयांच्या नोटाच बँकांकडे पाठवण्यात आल्या. त्यामुळे ग्राहकांना नवे चलन मिळाले. पण आता एवढी मोठी नोट कुठे सुटी करायची, हा प्रश्न कायम राहिला. त्यातच अनेक एटीएममध्ये १00 च्या नोटाच नव्हत्या आणि काही मशिन्स बंद होत्या. त्यामुळे देशभरात नोटांचा तुटवडा झाला आणि लोकांच्या संतापाला पारावार उरला नाही. आता एटीएम मशिनमध्ये २ हजारची नोट बसत नसल्याने हा घोळ आणखी काही दिवस चालणार आहे.चार-चार रांगेत उभे राहायला लावणारे हे सरकार आम्हाला काही कामधंदा नाही, असे समजते आहे की काय? सरकारला आमच्या त्रासाची, हालांची अजिबात जाणीव नाही. आम्ही आमच्याच हक्काच्या दोन आणि चार हजार रुपयांसाठी रांगेत उभे आहोत, पण बँकेतून, एटीएममधून ही रक्कम मिळेलच, याची खात्री नाही. पर्यायी व्यवस्था करणे शक्य नसताना, घाईघाईने पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्दच का केल्या? काळा पैसावाले खुशाल फिरत आहेत. त्यांना काही रांगेत उभे राहावे लागत नाही. आम्ही मेहनत, मजुरी करून ही रक्कम मिळवली आहे. पण तीही सहजासहजी आमच्या हाती द्यायला सरकार तयार नाही, अशा शब्दांत स्त्रिया, पुरुष, वृद्ध आपला संताप व्यक्त करताना दिसत होते.शुक्रवारी सकाळपासूनच लोकांच्या बँका आणि एटीएमसमोर रांगा लागल्या होत्या. परंतु अनेक एटीएम मशीन्स काम करीत नव्हती त्यामुळे लोकांची खूपच गैरसोय झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बँका आणि एटीएम परिसरात तत्काळ सुरक्षा वाढविली. अनेक एटीएममध्ये पैसेच नसल्याचे कळताच लोकांनी संताप व्यक्त केला. विमला देवी (६४) म्हणाल्या की, मी पहाटे चार वाजता उठून एटीएमवर आले तर तेथे आधीच मोठी गर्दी होती व तेथे रोख रक्कम नसल्याची तक्रार लोक करीत होते. हीच तक्रार अनेकांनी केली. कित्येक सहकारी बँकांमध्ये रक्कमच दुपारनंतर पोहोचली. तिथे जाणाऱ्या ग्राहकांना हात हलवत परतावे लागत होते. आम्ही मात्र काही कारण नसताना लोकांच्या शिव्या ऐकतो आहोत, असे अनेक बँक अधिकाऱ्यांनी बोलून दाखवले.पैशांसाठी आम्हालाच मरायची पाळी आलीनोटांसाठीच्या रांगेत मुंबईच्या मुलुंड भागात एका ज्येष्ठ नागरिकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हैदराबादमध्येही ७५ वर्षांचा एक वृद्ध बँकेच्या रांगेत उभा असताना मरण पावला. या बातम्या पसरताच लोक अधिकच चिडले. आमच्या पैशांसाठी आम्हालाच मरायची पाळी आली आहे, अशा प्रतिक्रिया अनेक जणांनी व्यक्त केल्या. मोदी सरकार आणखी किती लोकांना बँकेपुढील रांगेत मारू इच्छित आहे, असा सवाल एका महिलेने केला.निराशा, निराशा अन् निराशाचबँकांच्या अधिकाऱ्यांनी एटीएममध्ये रोख रकमेचा भरणाच झाला नसल्याचे त्यांना सांगितले. बँकांमध्येही १00 च्या नोटा आल्याच नाहीत. केवळ दोन हजार रुपयांच्या नोटाच पाठविण्यात आल्या. प्रत्यक्षात खर्चासाठी सुटी रोख रक्कम मिळत नसल्याने लोकांना निराश व्हावे लागले. काही बँकांनी त्यांच्याकडे पुरेशी रक्कम नसल्याने काउंटर लवकर बंद केले, तर काही बँकांनी चार हजारांऐवजी दोन हजारच बदलून दिले. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ, संताप व हतबलतेची भावना निर्माण झाली आहे.आयकर छाप्यांमुळे सराफा दुकाने बंद!गुरुवारी रात्री आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी देशभरात अनेक सोन्या-चांदीच्या दुकानांवर छापे मारल्यामुळे राजधानी व्यापाऱ्यांत घबराट पसरली आहे. दिल्लीसह देशभरातील काही सराफा व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली.