शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकाकडून 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास दिला नकार, कोर्टाने सुनावली शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 15:17 IST

10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देणे एका दुकानदाराला चांगलेच महागात पडले आहे.

भोपाळ - 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देणे एका दुकानदाराला चांगलेच महागात पडले आहे. त्याला एका स्थानिक न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि 200 रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा प्रकार मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यात घडला आहे. याबाबत अधिक माहिती देताना सहाय्यक लोकअभियोजक अधिकारी भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की, आकाश नावाच्या ग्राहकाने  अरुण जैन या दुकानदाराकडून  17 ऑक्टोबर 2017 रोजी दोन रुमाल खरेदी केले होते. त्याबदल्यात त्याने दुकानदाराला दहा रुपयांची दोन नाणी दिली होती. मात्र ही नाणी आता चलनात नाहीत, असे सांगून दुकानदाराने ही नाणी स्वीकारण्यास नकार दिला होता. वाद वाढल्यावर आकाश याने ही नाणी अजूनही चलनात आहेत आणि दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही, असा मुरैनाच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे असे वारंवार सांगितले. मात्र एवढे सांगितल्यावरही दुकानदाराने त्याच्याकडून नाणी स्वीकारली नाहीत. तसेच त्याच्याकडून रुमाल परत घेऊन त्याला माघारी धाडले.त्यानंतर या ग्राहकाने संबंधीत घटनेची माहिती पोलिसांना देऊन दुकानदाराविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी अरुण जैन या दुकानदाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आलेला दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यासंबंधीचा आदेश मोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच त्याला अटक करून त्याच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला.  त्यानंतर जौरा येथील न्यायदंडाधिकारी जे.पी. चिडार यांच्या न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी केली. या सुनावणीनंतर न्यायालयाने दुकानदार अरुण जैन याला दोषी ठरवले. तसेच त्याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि 200 रुपयांचा दंड ठोठावला.  

टॅग्स :Courtन्यायालयnewsबातम्या