शोपियाँ - जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी झालेल्या चकमकीत लष्कराने एक दहशतवादी आणि त्याला मदत करणाऱ्या तिघांना कंठस्नान घातले आहे. रविवारी रात्री लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यावेळी लष्करानेही प्रत्युत्तरदाखल गोळीबार केला. यामध्ये एक दहशतवादी ठार झाला. तसेच घटनास्थळावरून तीन अन्य मृतदेहसुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. हे मृतदेह दहशतवाद्याला मदत करणाऱ्यांचे असल्याचे लष्कराने सांगितले आहे. मात्र स्थानिकांनी हे मृतदेह सर्वसामान्य नागरिकांचे असल्याचा दावा केला आहे.
शोपियाँ येथे चकमक, एका दहशतवाद्यासह त्याला मदत करणारे तिघे ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 23:59 IST