शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी मुलाला जवानांनी घेरलं; बातमी ऐकताच वडिलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 11:56 IST

जम्मू काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या शोपियामध्ये आज सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. तर 5-6 दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरलं आहे. यामध्ये दहशतवादी जीनत नाइकूचा समावेश आहे. जीनतला सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरल्याची माहिती समजताच त्याचे वडील मोहम्मद इशाक नाइकू यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. जीनत शोपियामधील मेमंदर गावचा रहिवासी आहे. दोन महिन्यांपूर्वी तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाला. त्याला आज सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांनी शोपियामध्ये घेरलं. याची माहिती समजताच त्याच्या वडिलांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आलं. काल रात्रीपासून शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या भागातील एका घरात 5-6 दहशतवादी लपून बसले होते. यातील दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. जवानांनी शेजारच्या घरांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. स्थानिकांकडून केली जाणारी दगडफेकदेखील नियंत्रणात आणली आहे. सध्या या ठिकाणी 34 राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि पोलीस तैनात आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी पोलिसांसह या संपूर्ण भागाला वेढा घातला आहे.  

टॅग्स :terroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर