शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! 7 वर्षांपूर्वी मंदिराबाहेरुन चोरीला गेलेले बूट; पोलिसांचा आता आला फोन, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 17:38 IST

एका व्यक्तीचे सात वर्षांपूर्वी प्रसिद्ध सावरिया सेठ मंदिरातून बूट चोरीला गेले होते.

राजस्थानच्या चित्तौडगडमधील एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीचे सात वर्षांपूर्वी प्रसिद्ध सावरिया सेठ मंदिरातून बूट चोरीला गेले होते. शिवपुरी येथील रहिवासी महेंद्रकुमार दुबे यांनी या घटनेबाबत मंडाफिया पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या संदर्भात पोलिसांना नुकतेच काही बूट सापडले आहेत. यानंतर पोलिसांनी व्यक्तीला बूट ओळखण्यासाठी बोलावलं. मात्र, प्रवासाचा खर्च जास्त असल्याने महेंद्र दुबे यांनी पोलीस ठाण्यात येण्यास नकार दिला.

4 जानेवारी 2017 रोजी मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील रहिवासी महेंद्र कुमार दुबे दर्शनासाठी आले होते. यावेळी दर्शन घेतल्यानंतर त्यांचे बूट चोरीला गेले. महेंद्र कुमार दुबे हे विक्षिप्त स्वभावाचे व्यक्ती असल्याचे सांगण्यात आले. बूट चोरीला गेल्यानंतर संतप्त झालेल्या त्यांनी मंडाफिया पोलीस चौकीत याप्रकरणी लेखी तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी काही बूट जप्त केले.

अलीकडेच महेंद्रकुमार दुबे यांना फोनवरून माहिती मिळाली की, मंदिर परिसरातून चोरीचे बूट सापडले आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात येऊन तुमचे बूट ओळखा. यावर व्यक्तीने पोलिसांना फोटो पाठवण्यास सांगितला, जेणेकरून ते फोटोवरून ओळखू शकतील, परंतु पोलिसांनी नकार देत बूट ओळखण्यासाठी तुम्हाला पोलीस ठाण्यात यावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर तुमचे जबाब नोंदवले जातील. तरच बूट मिळतील.

एका न्यायाधीशाचा मुलगा मंदिरात दर्शनासाठी आला होता. त्यानंतर न्यायाधीशांच्या मुलाचे बूटही मंदिरातून चोरीला गेले. याबाबत न्यायाधीशांच्या मुलाने बूट चोरीला गेल्याची तक्रार केली. या घटनेने पोलीस प्रशासनात चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. हे प्रकरण खूप चर्चेत राहिले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही बूट जप्त केले. या प्रकरणाचे वृत्त समजल्यानंतर महेंद्रकुमार दुबे यांनी पोलिसांना फोन करून त्यांच्या तक्रारीचा हवाला देत कारवाईबाबत विचारणा केली. त्यावर पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात येऊन बूट ओळखण्यास सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Policeपोलिस