शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक, क्वॉरंटाइन सेंटरमध्ये सापाच्या दंशाने चिमुरडीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 13:12 IST

मुलगी शाळेच्या एका खोलीत झोपली होती.त्याचवेळी तिच्याजवळ एक भला मोठा साप बसला होता.

अनेक ठिकाणी क्वॉरंटाइन सेंटरमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेकांना आपला जीव मुठीत घेऊनच क्वॉरंटाइन सेंटरमध्ये राहावे लागत आहे. १४ दिवस अशा ठिकाणी काढणे म्हणजे एक मोठ्या संकटावर मात केली, अशी भावना निर्माण होते. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. योग्य ती स्वच्छता न केल्यामुळे मच्छर आणि सरपटणा-या प्राण्यांचाही तिथे धोका निर्माण होतो. अनेकांचे कोरोनापासून नाही तरी इतर गोष्टींमुळेच मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. बेतालघाट जिल्ह्यातील 4 वर्षीय अंजना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दिल्लीहून आई-वडिलांसह सुखरुप गावी पोहोचली होती. मात्र क्वारंटाईन सेंटरमध्ये सापाने दंश केल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

गावात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून  सध्या शहरांतून प्रत्येकालाच कोरोनाची चाचणी करावी लागते त्यानंतर गावात प्रवेश करण्याआधी क्वॉरंटाईन सेंटरमध्ये १४ दिवस राहावे लागत आहे. १४ दिवस पूर्ण केल्यानंतरच  गावात प्रवेश देण्यात येत आहे. दिल्लीहून आई-वडिलांसह आलेली ४ वर्षाची चिमुरडीलाही  गावातील शाळेत क्वारंटाइन करण्यात आलं होतं. मात्र ही क्वॉरंटाईन सेंटरच मुलीचा घात करेल याचा विचारही कधी कोणी केला नसेल. 

मुलगी शाळेच्या एका खोलीत झोपली होती. त्याचवेळी तिच्याजवळ एक भला मोठा साप बसला होता. त्यावेळी मुलगी एकटीच झोपली होती. आई- वडील बाहेर बसले होते. मुलगी काय करते हे पाहण्यासाठी वडील खोलीत आले. 

तेव्हा खोलीत सापाला बघून त्यांच्याही पायाखालची जमीन घसरली. त्यांनी कसंबसं सापापासून मुलीची सुटका केली. यानंतर मुलीच्या शरीरावर सापाने दंश केल्याच्या निशाण त्यांनी पाहिले. लगेचच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिला वाचविण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. या चिमुरडीच्या मृत्यूला जबाबदार कोण?  हा प्रश्न मात्र कायम आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या