शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Video : जागरण गोंधळामध्ये पार्वतीच्या वेषात नृत्य करताना अचानक खाली पडला; स्टेजवरच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 13:30 IST

नाचता नाचता अचानक मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गायक केकेचा मृत्यू देखील असाच झाला होता.

नाचता नाचता अचानक मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गायक केकेचा मृत्यू देखील असाच झाला होता. यानंतर युपीमध्ये वाढदिवसाच्या पार्टीमध्ये एकाचा नाचत असताना मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांतच हनुमानाच्या भूमिकेत नाचणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आता जम्मूमधून अशीच एक घटना समोर आली आहे. पार्वती देवीच्या वेषात डान्स करणाऱ्या व्यक्तीचा नाचता नाचता हार्ट अ‍ॅटॅक येऊन मृत्यू झाला आहे. 

जम्मूच्या बिश्नेहमध्ये जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते. योगेश गुप्ता नावाचा व्यक्ती देवी पार्वतीच्या भूमिकेत नाचत होता. बराच वेळ नाचल्यानंतर तो अचानक जमिनीवर पडला पण परत उठलाच नाही. यामुळे आयोजकांची धावाधाव झाली. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्याला हृदयविकाराचा झटका आला व त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

कोठे सैनिया गावात हा कार्यक्रम होता. यावेळी कलाकार देवी-देवतांच्या भूमिकेत नाचत होते. रंगमंचावर शिवपार्वतीच्या लीला रंगल्या होत्या. योगेश हा २० वर्षांचा होता. तो शिवस्तुतीवर नृत्य करत होता. नाचत असताना योगेश खाली पडला. तो उठत नसल्याचे पाहून शंकराच्या भूमिकेत असलेल्या कलाकाराने त्याच्याकडे धाव घेतली. काही काळ प्रेक्षकांना काहीच कळले नाही. नंतर त्यांना स्टेजवर काय घडले याचा अंदाज आला. 

 

वाढदिवसाच्या पार्टीत मित्राचा मृत्यू...यापूर्वी बरेलीमध्ये डान्स करताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत (आयव्हीआरआय) नियुक्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रभात प्रेमी (४५ वर्षे) हा त्याचा मित्र विशाल उर्फ ​​मनीष याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला आला होता. शहरातील एका हॉटेलमध्ये या बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. डीजेच्या तालावर नाचत असताना त्याचा मृत्यू झाला. काही दिवसांनी मैनपुरी येथील गणेश मंडळामध्ये नृत्य करताना कलाकार रवी शर्मा याचा मृत्यू झाला. हनुमानाचे पात्र साकारत असताना तो अचानक स्टेजवर पडला. उपस्थित प्रेक्षकांना तो अभिनय करतोय असे वाटले. पण काही वेळ तो उठला नाही की हालचाल नाही हे पाहून धावपळ उडाली. तोवर त्याचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलHealthआरोग्य