शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

धक्कादायक...मोदींवरील डॉक्युमेंट्रीसाठी रेल्वेची बोगी जाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 09:54 IST

प्रतापनगर आणि विश्वामित्र या मार्गावर ब्रॉड गेज आणि नॅरो गेजवरील शुटींगसाठी चार दिवसांची परवानगी दिली होती.

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनविण्यात येणाऱ्या डॉक्युमेंट्रीच्या शुटींगसाठी रविवारी रेल्वेची एक अख्खी बोगीच पेटविण्यात आली होती. 2002 मधील गोध्रा हत्याकांडाची दृष्ये चित्रित करण्यासाठी बोगीला आग लावण्यात आली होती. पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही बोगी मॉक ड्रीलसाठी राखीव ठेवण्यात आली होती. गोध्रा हत्याकांडावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.

बडोदा विभागिय रेल्वेचे प्रवक्ता खेमराज मीना यांनी सांगितले की, ही बोगी देण्यासाठी आम्ही त्याबदल्यात निर्मात्यांकडून भाडे आकारले आहे. त्यांना प्रतापनगर आणि विश्वामित्र या मार्गावर ब्रॉड गेज आणि नॅरो गेजवरील शुटींगसाठी चार दिवसांची परवानगी दिली होती. सोमवारी शुटींगचा शेवटचा दिवस होता. निर्मात्यांना सांगण्यात आले आहे की, आम्हाला ही बोगी जशी आम्ही दिली होती त्या स्थितीत परत करायची आहे. 

या डॉक्युमेंट्रीसाठी मुंबईमध्येही सेट तयार करण्यात आला असून गोध्रा ट्रेन हत्याकांडासाठी प्रतापनगरमध्ये शुटींग करण्यात आले. कोच केअर सेंटरच्या जवळच हा सेट बनविण्यात आला होता, असे निर्देशक उमेश शुक्ला यांनी सांगितले.या डॉक्युमेंट्रीमध्ये विवेक ओबेरॉय मुख्य भुमिकेत आहे. 

तर डॉक्युमेंटरीचे धवल पांड्या यांनी रेल्वेचा कोच जाळल्याचे वृत्त फेटाळले आहे. आम्ही रेल्वेच्या नादुरुस्त कोचचा वापर केला. चित्रिकरण केले. या कोचला आग लागल्याचे स्पेशल इफेक्टद्वारे दाखविण्यात येणार असून हा सीन 20 सेकंदांचा आहे. गोध्रा हत्याकांडानंतर दंगल उसळली होती...गुजरातमध्ये 27 फेब्रुवारी 2002 मध्ये साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली होती. यामध्ये 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता. ज्यानंतर गुजरातच्या अन्य शहरांमध्ये दंगल उसळली होती. यामध्ये अल्पसंख्यांक समाजाचे 1000 हून जादा लोक मारले गेले होते. 

टॅग्स :Gujarat Riots 2002गुजरात दंगल 2002Narendra Modiनरेंद्र मोदी