शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! काम करण्यास नकार देणा-या दलित महिलेचं कापलं नाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 09:09 IST

एका दलित महिलेनं केवळ काम करण्यास नकार दिला म्हणून उच्च जातीतील बाप-लेकानं मिळून चक्क तिचं नाक कापल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. इतकंच नाही तर या महिलेसह तिच्या पतीला अमानुष मारहाणही करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील रेंवझा गावात ही घटना घडली आहे. 

नवी दिल्ली, दि. 18 - एका दलित महिलेनं केवळ काम करण्यास नकार दिला म्हणून उच्च जातीतील बाप-लेकानं मिळून चक्क तिचं नाक कापल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. इतकंच नाही तर या महिलेसह तिच्या पतीला अमानुष मारहाणही करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील रेंवझा गावात ही घटना घडली आहे. 

सुरखी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आर.एस.बागरी यांनी सांगितले की, सोमवारी नरेंद्र सिंह (वय 32 वर्ष) आणि त्याचे वडील साहेब सिंहनं राघवेंद्र धानक (वय 40 वर्ष) आणि त्यांची पत्नी जानकी यांना आपल्या घरी येऊन काम करण्यास सांगितले होते. मात्र, राघवेंद्र यांनी काम करण्यास नकार दिला. राघवेंद्र यांनी काम करण्यास नकार दिला म्हणून बापलेक भडकले आणि दोघांनाही शिवीगाळ करत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. 

बागरी यांनी सांगितले की, जेव्हा जानकी आपल्या जखमी पतीस हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होती त्यावेळी नरेंद्र आणि साहेबनं तिला रस्त्यात गाठलं व तिचं नाक कापल्याची कथित माहिती समोर आली. दरम्यान, जेव्हा पीडित महिलेनं मध्य प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्ष लता वानखेडे यांच्यासमोर हे प्रकरण मांडत आरोपींना शिक्षा करण्याची मागणी केली त्यावेळी हा धक्कादायक व गंभीर प्रकार समोर आला. 

महिला आयोगाच्या खंडपीठासमोर जानकीनं तिला झालेली मारहाण तसंच नाक कापल्याची ही घटना मांडली. या प्रकरणी दलित आणि आर्थिक स्वरुपात कमकुवत असलेल्या कुटुंबाच्या तक्रारीची महिला आयोगाच्या अध्यक्षानं गांर्भीयानं दखल घेतली आहे. शिवाय पोलिसांनादेखील कारवाईचे आदेश दिले सांगितले आहे की, आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी.  मिळालेल्या आदेशानुसार व पीडित महिलेच्या तक्रारीवरुन आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्यांना अटकही केली आहे.