शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ज्योती व्हिडीओ पब्लिश करण्याआधी पाकिस्तानी अधिकाऱ्याला पाठवायची, काय होतं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 11:03 IST

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राच्या चौकशीदरम्यान एक मोठा खुलासा झाला आहे.

पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, ती सोशल मीडियावर पाकिस्तानशी संबंधित व्हिडीओ पोस्ट करण्याआधी ते व्हिडीओ दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी दानिश याला पाठवत होती.

व्हिडीओ एडिटिंग आणि गुप्त माहितीवर नियंत्रणदानिश ज्योतीने पाठवलेले हे व्हिडीओ बघायचा आणि या व्हिडिओंचे परीक्षण करून त्यातील संवेदनशील किंवा पाकिस्तानच्या सुरक्षेशी संबंधित माहिती वगळण्याचा सल्ला द्यायचा. त्यानंतर ज्योती व्हिडीओ एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट करत असे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, हा एक योजनाबद्ध प्रचाराचा भाग असून पाकिस्तानच्या प्रतिमेला सांभाळत, भारतात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा हेतू यामागे असू शकतो.

बँक खात्यांमधून संशयास्पद व्यवहारतपासादरम्यान ज्योतीच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ पाठवण्याचे स्पष्ट पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. याशिवाय, तिच्या चार बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. तपास यंत्रणा या आर्थिक व्यवहारांचा संबंध कोणत्याही परदेशी आर्थिक नेटवर्कशी आहे का, हे तपासत आहेत.

वकील करण्यासाठी पैसे नाहीत!सध्या ज्योतीच्या वतीने कोणत्याही वकिलाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. तिचे वडील, हरीश मल्होत्रा यांनी सांगितले की, "वकील करण्यासाठी आमच्याकडे आर्थिक पाठबळ  नाही. गेल्या काही दिवसांत शेजारी आणि नातेवाईक देखील आमच्याशी संपर्क टाळत आहेत."

तपास यंत्रणा सध्या ज्योतीच्या ट्रॅव्हल पॅटर्न्सचा अभ्यास करत असून, तिने प्रवास केल्यानंतर संबंधित भागांमध्ये घडलेल्या दहशतवादी घटनांशी तिच्या व्हिडीओ पोस्टिंगचा काही संबंध आहे का, याचा शोध घेत आहेत. विशेषतः, या प्रवासांचे आर्थिक प्रायोजक कोण होते? तिला आर्थिक मदत कोण देत होते? यासंबंधी तपास सुरू आहे.

टॅग्स :Jyoti Malhotraज्योती मल्होत्राPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान